चोपडा (छोटु वाडे) – येथील डाॅ. पृथ्वीराज सैंदाणे गेल्या आठ वर्षांपासून चोपडा तालुक्यात नॅचरोपॅथी केंद्र व्यवस्थितपणे चालवत आहेत. त्यांनी प्राकृतिक चिकित्सा केंद्रामार्फत आतापर्यंत १२५ गावात विनामूल्य नॅचरोपॅथीचे मोफत शिबिरे घेतली असून डॉ. सैंदाणे हे सुशिक्षित बेरोजगारांना नॅचरोपॅथी बद्दल मोफत मार्गदर्शन ही देतात.
काही गरजवंत नागरिकांनी नॅचरोपॅथी केंद्रातून जळीबुटीच्या औषधी वनस्पती घेऊन जुन्यातले जुने आजार त्यांच्या औषधी ने बरे केलेले आहेत. ते सदैव ह्या नॅचरोपॅथी बद्दल प्रचार आणि प्रसार शिबीरादवारे करतात. त्यांचे औषधी वनस्पतींचे गुण पाहून त्यांना आयुष इंटरनॅशनल मेडीकल असोसिएशन ( AIMA) राष्ट्रीय एंव आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष डाॅ. नितीनराजे पाटील , डाॅ.दिशा चव्हाण , महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नॅचरोपॅथीचे डाॅ. धिरज मेश्राम यांनी दि. ३० सप्टेंबर रोजी डाॅ. पृथ्वीराज सैंदाणे यांची चोपडा तालुका नॅचरोपॅथी अध्यक्ष पदासाठी निवड करून त्यांना गौरविले आणि त्यांच्या कडे रिसचॅ अॅड डेव्हलपमेंट एवं नॅचरोपॅथी प्रचार- प्रसार साठीचे कामे सोपविले आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.