Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कोरोनामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे उल्लेखनीय भूमिका

by Divya Jalgaon Team
October 18, 2020
in जळगाव
0
dr. dipak mhasekar

जळगाव  –  कोरोना सारख्या भयंकर आजाराच्या काळात राष्ट्रीय सेवा योजनेने अत्यंत महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. शासनाने निर्देशित केलेले नियम वेळोवेळी समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम जसे केले तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही महत्त्वपूर्ण संकल्पना ही संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रीय सेवा योजना प्रबोधनातून व सर्वेक्षणातून समाजापर्यंत पोहोचवीत आहे .या कार्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कामही  उल्लेखनीय आहे. असे विचार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी विद्यापीठस्तरीय “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेच्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मांडले.

याप्रसंगी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ.पी.पी.माहुलीकर हे अध्यक्षस्थानी होते. प. क. कोटेचा महिला महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचे उद्घाटन व जनजागृती अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी विचार मांडले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यापीठ पातळीवरील माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचे समन्वयक डॉ. अनिल बारी यांनी प्रास्ताविक केले .तर शासनाच्या वतीने राज्य संपर्क अधिकारी प्राचार्य डॉ.अतुल साळुंखे यांनी या योजनेचे महत्त्व विशद करून त्रिसूत्री शासनाने सांगितले आहे ती राष्ट्रीय सेवा योजना घराघरापर्यंत पोहोचत असल्याचे नमूद केले. सोबतच आजवर राष्ट्रीय सेवा योजनेचे महाराष्ट्रात सगळ्यात विद्यापीठांनी उल्लेखनीय काम केल्याचे नमूद करताना नंदुरबार सारख्या जिल्ह्यात तंत्रज्ञानाची अडचण असतांनाही उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विविध योजना यशस्वीपणे राबविले.

कार्यशाळेचे सूत्रसंचालन नंदुरबार जिल्हा समन्वयक डॉ.माधव कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यशाळेच्या समन्‍वयक व कार्यक्रम अधिकारी डॉ. शुभांगी राठी यांनी मानले. पाहुण्यांचा परिचय या मोहिमेचे समन्वयक डॉ. प्रशांत कसबे यांनी केले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंगला साबद्रा , विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. मीना चौधरी यांच्यासह उपप्राचार्य, महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, धुळे, जळगाव जिल्हा समन्वयक व सर्व विभागीय समन्वयक ,कार्यक्रम अधिकारी, विद्यार्थी स्वयंसेवक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

अजून वाचा 

धक्कादायक : फ्रीजमधील पदार्थांवर आढळले कोरोनाचे विषाणू

Share post
Tags: Corona NewsDr. Dipak MhasekarJalgaon newsRashtriya Seva Yojana
Previous Post

Netflix च्या नव्या ग्राहकांना मोठा धक्का

Next Post

आयुष इंटरनॅशनल मेडीकल असोसिएशन नॅचरोपॅथीपदी डाॅ. सैंदाणे

Next Post
chhotu wade news

आयुष इंटरनॅशनल मेडीकल असोसिएशन नॅचरोपॅथीपदी डाॅ. सैंदाणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group