चीन – करोना विषाणूनं जगभरात थैमान घातलं असून, प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच प्रसार आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर लस निर्मितीचं काम सुरू आहे. अनेक देशात लस निर्मितीवर काम असून, कोरोनाचे विषाणू करोनाचं स्वरूप बदलताना दिसत आहे. करोनासंदर्भात नवीन बाब समोर आली आहे. फ्रीजमध्ये थंड करण्यात आलेल्या पदार्थांच्या आवरणावर कोरोनाचे विषाणू आढळून आले आहेत.
चीनमधील रोग नियंत्रण
चीनमधील रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्रानं हे निरीक्षण नोंदवलं आहे. फ्रीजमध्ये थंड करण्यात आलेल्या पदार्थांच्या आवरणावर करोनाचे जिवंत विषाणू असल्याचा दावा केंद्रानं केला आहे. चीनमधील किनारपट्टी भागात असलेल्या किंगदाओ शहरात हे आढळून आलं आहे.
थंड करण्यात आलेल्या पदार्थांना असलेल्या आवरणावर करोनाचे जिवंत विषाणू आढळून आले आहेत. या पदार्थांच्या आवरणाच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग होण्याचा धोका असल्याचं चीनच्या रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्रानं म्हटलं आहे. किंगदाओ शहरात या महिन्यात अनेक करोना रुग्ण आढळून आले. यात परदेशातून आलेल्या आणि उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या रुग्णालयाशी संपर्क येणार रुग्ण अधिक आहेत.
परदेशातून शीतपदार्थ आयात
परदेशातून शीतपदार्थ आयात करण्यामुळे करोना वाढीचा धोका अधिक असल्याचं चीनकडून सातत्यानं सांगितलं जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून चीनकडून याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. यापूर्वी काही देशांमध्ये अशा पदार्थांच्या आवरणांची तपासणी करण्यात आली होती. ज्यात करोना विषाणू असल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर इंडोनेशियातील सीफूड आणि ब्राझीलमधील चीननं बंदी घातली होती.
थंड अन्न पदार्थांच्या आवरणावर करोना विषाणू आढळून आले असल्याचा दावा चीननं केला आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेनं ही बाब फेटाळून लावलेली आहे. अन्न पदार्थांच्या आवरणाच्या माध्यमातून करोनाचा प्रसार होत असल्याचा कोणताही पुरावा सापडला नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलेलं आहे.
अजून वाचा
दिलासादायक ! भारतात रुग्णसंख्येमध्ये होतीये घट