मुंबई : सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील वायदा बाजारात गुरुवारी सोने 50 हजारांच्या पार गेले, तर चांदीच्या किमतींनी 67 हजार 500 रुपयांचा टप्पा पार केला. गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याच्या किमतीत चढउतार होताना दिसत आहेत. अमेरिकेत मिळालेल्या मदतीच्या पॅकेजमुळे सोन्याच्या किमतीत उसळी आल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सोन्याच्या दरात तेजी का? जाणून घ्या आजचा दर
गुरुवारी सकाळी वायदा बाजारात मार्च डिलीव्हरीची चांदी 759 रुपयांच्या वाढीसह प्रतिकिलो 66 हजार 670 रुपयांवर गेली. चांदीचा दर बुधवार अखेरीस 65 हजार 911 रुपये इतका होता. चांदीच्या किमतीत सलग तिसऱ्या दिवशी उसळी पाहायला मिळाली. वायदे बाजारात हा भाव 67 हजार 500 रुपयांच्या वर गेला आहे.
सोन्याच्या किमतीत घसरणीची चिन्हं
कॉपरही आठ वर्षांतील उच्चांकी पातळीवर आहे. निकेलने 14 महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. झिंक, अॅल्युमिनियम आणि लीडमध्येही तेजी आहे. तज्ज्ञ अद्यापही सोन्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. कारण सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोन्याच्या दरात तेजी का? जाणून घ्या आजचा दर
मार्च ते ऑगस्ट या काळात सोन्याच्या भावात मोठी उसळण आली होती. मात्र कोरोना लस दृष्टीपथात आल्याची बातमी समजताच सोन्याची चमक फिकी पडू लागली. नोव्हेंबरमध्ये सोन्याच्या किमतीत गेल्या चार वर्षांतील सर्वात मोठी मासिक घट दिसून आली. पण आता सोनं पुन्हा वेगाने महागत आहे.
विक्रमी सोने
सोन्याच्या किमतींनी यावर्षी विक्रम नोंदवला होता. सोन्याचा दर 7 ऑगस्टला प्रतितोळा 56 हजार 200 रुपये इतका होता. या किमतीत 10 टक्क्यांपेक्षा अधिक घसरण आहे. चांदीचे दर 10 ऑगस्टला 78 हजार 256 रुपये प्रतिकिलोवर होते. दीर्घ काळापासूनच सोनं हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय ठरत आला आहे.
खरं तर, जगातील आर्थिक संकट जेव्हा अधिक गडद झालं, तेव्हा सोन्याने आपला भाव वाढवला. ग्राहक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीची निवड करतात. किंमतीत वाढ झाल्याने सोन्यातील गुंतवणुकीची व्याप्ती वाढत आहे. ग्राहक प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी डिजिटल माध्यमातून सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत
जळगाव
सोने – 51,741 प्रति तोळा
चांदी – 69,604 प्रतिकिलो
अजून वाचा
Share Market : सेन्सेक्समध्ये वाढ, points अंकांच्या वाढीसह खुला