जळगाव प्रतिनिधी । जळगावात रिक्षा चालकाची पोलिसांना अरेरावी करण्यात आली. सुभाष चौक परिसरात वाहतुकीस अडथळा निर्माण केला म्हणून रिक्षाचालकास वाहतूक पोलीसाला दमदाटी करुन वाहतुक पोलिसांना अरेरावी करण्यात आली. हा प्रकार १७ रोजी च्या सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास घडला. रिक्षाचालकाविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
शहरातील सुभाष चौकात आज नेहमीप्रमाणे कमलाकर तुकाराम बडगुजर हा शहर वाहतुक शाखेचा कर्मचारी कर्तव्य बजावित होते. यावेळी चंद्रकांत विठ्ठल अभंगे (वय ३० रा. कंजरवाडा) हा एमएच १९ व्हीडबल्यू ३६०५ क्रमांकाचा रिक्षाचालक हा वाहतुकीस अडथळा निर्माण होईल याप्रमाणे त्याने रिक्षा लावली होती. दरम्यान कमलाकर बडगुजर यांनी त्याला रिक्षा रस्त्यातून बाजूला घेण्यास सांगितले असता रिक्षाचालकाला त्याचा राग आला. त्याने तू कोण मला सांगणारा.. तुला बघून घेतो असे म्हणत त्याने बडगुजर यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. या वादात बडगुजर यांनी त्याच्या रिक्षाचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता वाद घातला.
रिक्षाचालक वारंवार बडगुजर यांच्यासोबत वाद घालत असल्याने त्यांनी कारवाई करण्यासाठी रिक्षाचालकाला रिक्षा वाहतुक शाखेत घेण्यास सांगितले. यावेळी कमलाकर बडगुजर यांना रिक्षाचालकाने रिक्षा बसवून तो पांडे डेअरी चौकाकडे निघाला. रिक्षा पांडे चौकाकडून स्वातंत्र्य चौकाकडे न घेवून जाता रिक्षाचालक सिंधी कॉलनीच्या दिशेने पळविली. सिंधी कॉलनीजवळील कंवरनगर पोलिस चौकीजवळ रिक्षा पोहचली असता रिक्षाचालकाने स्वत:हून रिक्षा पलटी करीत अपघात केला.
तसेच पोलिसानेच आपली रिक्षा पलटी केली व अपघात होवून पाय फ्रॅक्चर झाल्याचा बनाव करीत आरडाओरड करीत आपल्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलावून घेतले. घटनास्थळी अभंगे याच्या नातेवाईकांनीही पोलिसाला दमदाटी करत अपघातात जखमी झाल्याने दवाखान्यात घेवून जाण्यासह पाच हजार रुपयांची मागणी केली. तसेच जबरदस्तीने रिक्षाचालकासह वाहतूक पोलिसांना शहरातील नाहाटा रुग्णालयात घेवून गेले. याठिकाणी नातेवाईकांनी गर्दी करत कर्मचार्याला अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये म्हणून पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी स्वतः घटनास्थळ गाठले. तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशन, जिल्हापेठ पोलीस स्टेशनसह दंगा नियंत्रण पथकाचा बंदोबस्त मागविला. यावेळी पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. रिक्षाचालकाला वाहतूक पोलीस रिक्षा वाहतूक शाखेत घेवून जाण्याचे सांगत असतांनाही रिक्षा दुसरीकडे पळविली. याप्रकाराचा वाहतूक पोलिसाने व्हिडीओ बनविला होता.
पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी माहिती घेवून सदर प्रकाराबाबत गुन्हा दाखल करण्याच्या सुचना केल्या. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात वाहतूक पोलीस कमलाकर बडगुजर यांच्या फिर्यादीवरुन रिक्षाचालक चंद्रकांत अभंगे याच्यासह इतरांविरोधात वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.