Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भारतरत्न डॉ . ए . पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगावतर्फे कार्यक्रम

by Divya Jalgaon Team
December 17, 2020
in जळगाव
0

जळगाव – भारतरत्न डॉ . ए . पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगावतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्रतस्थ कला उपासक श्याम कुमावत यांनी प्रतिपादन केले की, कलाग्रामच्या उभारणीतून नशिराबादचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणे हेच जीवनाचे अंतिम ध्येय.

श्याम कुमावत यांना शाल श्रीफळ देऊन त्यांच्या ” चित्रस्वामी ” निवासस्थानी भिशीचे समन्वयक विजय लुल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवसेवा विद्यालयाचे कला शिक्षक सुनिल दाभाडे होते . प्रमुख अतिथी हेमंत सावकारे श्रीराम विचवे , योगेश कोलते , प्रताप कुमावत , प्रभाकर चौधरी आदी उपस्थित होते.

मध्यप्रदेश संस्कृति परिषद कालिदास संस्कृत अकादमी उज्जैन आयोजित राष्ट्रीय कालिदास समारोह २०२० मध्ये श्याम कुमावत यांच्या ” ग्रीष्मवर्णन सम्पूर्ण ” पेंटिंगला देशभरातून आलेल्या १६५ पेंटींग्ज मधून आलेल्या कलाकृतींमधून ‘ राष्ट्रीय कालिदास चित्रकला ‘ सन्मानाचा राष्ट्रस्तरीय एक लाखाचा पुरस्कार प्राप्त झाल्याप्रीत्यर्थ सत्कार करण्यात आला . विजय लुल्हे म्हणाले की , श्याम सरांच्या सृजनशिलतेत भारतीय संस्कृती व परंपरा यांचे मनोवेधक कलेचं अद्वैत आहे. तसेच सुनिल दाभाडे  म्हणाले की , रेषेचीअलंकृत प्रमाणबद्धता व गतिशीलता हा पिताश्रींचा कला वारसा सरांना जन्म जात मिळाला आहे.

कलाग्राम उभारण्याचे उद्दिष्ट्ये , नियोजनाचा आराखडा , आजतागायत केलेली कार्यवाही व तरतुदी याबाबत अनौपचारिक सांगोपांग चर्चा कुमावत यांनी केली . दुसऱ्या सत्रात विश्वकर्मा पंच मडळातर्फे कमर्शियल आर्टिस्ट संजय जाधव यांच्या हस्ते शाल , श्रीफळ देऊन पुरस्कार मिळाल्याबद्दल कुमावत सरांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला . त्याप्रसंगी विश्वकर्मा पंच मंडळाचे माजी सचिव मधुकर जाधव व समाज बांधव उपस्थित होते . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पेंटर यशवंत जाधव व विश्वकर्मा पंच मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र जंजाळकर यांनी सहकार्य केले . सूत्रसंचालन व आभार डॉ . दिपक लोखंडे यांनी मानले.

Share post
Tags: Dr. A P J Abdul KalamJalgaonभारतरत्न डॉ . ए . पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगावतर्फे कार्यक्रम
Previous Post

शिरसोली प्र न निवडणुकीच्या पॅनलसाठीची बैठक संपन्न

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ‘नॉन कोविड’ सुविधांना प्रारंभ

Next Post
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 'नॉन कोविड' सुविधांना प्रारंभ

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 'नॉन कोविड' सुविधांना प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group