जळगाव – शिरसोली गावात आज निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली. गावाची ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम लागल्याने दि. 23 ते 30 डिसेंबर 2020 पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असून 31 तारखेला छाननी त्यानंतर 4 जानेवारी 2021 पर्यंत माघारीची मुदत व 15 ला मतदान आणि 18 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी असून त्या अनुषंगाने राजे संभाजी चौक, शिरसोली प्र न येथील कार्यालयात चर्चा करण्यात आली.
यावेळी भागवत ताडे, सुनील बारी सर, गिरिश वराडे, गोपाल अस्वार, गोकुळ ताडे, दत्तू पाटील, संतोष काटोले, मधुकर आंबटकर व जुन्या अनुभवी मंडळींच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रभाग व आरक्षण निहाय सविस्तर चर्चा करण्यात आली. गावातील विकास कामे, नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण कसे करावे, याबाबतीत चर्चा करून आपण ते पूर्णत्वास नेण्याचा निर्धार करू आणि (Nation First) सर्वोच्च प्राधान्य राष्ट्रहिताला देऊन या प्रश्नांचा पाठलाग करून सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावे जेणेकरून गावाचा विकास साधला जाईल यासाठी निवडणूक लढवायची व निवडणूक पॅनल बनवावे असे सर्वानुमते ठरले.
दि 20 डिसेंबर 2020 पर्यंत नाव नोंदणी साठी वेळ निश्चित झालेली आहे. तसेच सुनिल सुकलाल बारी (7020778664), नितीन संजय नागपुरे (9158023466) यांच्याशी संपर्क साधावा. यावेळी प्रभाग निहाय इच्छुकांची नावे प्राप्त झाली आहेत. यात प्रभाग क्रमांक 1- सुनील सुकलाल बारी, संगीता सुनिल बारी, प्रभाग क्रमांक 2- मधुकर प्रभाकर आंबटकर, गिरीश श्रीकृष्ण वराडे, भागवत रामदास ताडे, सुनिल सखाराम भिल, संतोष त्र्यंबक काटोले,
प्रभाग क्रमांक 3- वैशाली भागवत ताडे, सुपडू रामदास पुसे, गोपाल सिताराम अस्वार, सुरेखा सुनिल नागपुरे, चंद्रकांत नामदेव अस्वार, राहुल साहेबराव सोनवणे, गोकुळ भीमराव ताडे, प्रभाग क्रमांक 4- सुनील फकीरा नागपुरे, निलेश प्रमोद वाणी, प्रभाग क्रमांक 5- कैलास पुनमचंद माळी, प्रभाग क्रमांक 6- चंद्रकांत रामकृष्ण महाजन, विशाल पवार, करीम रहीम शहा, जायदा बी करिम शहा, असे प्रभाग निहाय इच्छुकांचा समावेश आहे. तरी विठ्ठल ज्ञानेश्वर भालेराव यांनी आवाहन केले आहे कि, सदरच्या पॅनलसाठी गावातील तरुण व सुज्ञ नागरिकांनी नाव सुचवावे.