जळगाव प्रतिनिधी । शहरातील जळगावातील चित्रा चौकामधील ईलेक्ट्रॉनिक दुकानदाराची फसवणूक झाल्याची घटना आज वस्तू घेण्याच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक झाली. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
दुकान मालक मनिष गुरूमुखदास आहुजा (वय-२४) रा. राधाकृष्ण मंगल कार्यालय, गणेशवाडी यांचे चित्रा चौकात स्वामी ईलेक्ट्रॉनिक नावाचे दुकान आहे. १५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास आनंद कुमार नाव्याच्या व्यक्तीचा फोन आला. म्हणाला की, मी इंडियन आर्मी मधून बोलत आहे.
मला तुमच्या इलेक्ट्रॉनी शॉपमधून एलईडी फोकस खरेद करायचे आहे त्यासाठी किती रूपये लागतील हे सांगा. यावरून मनिष अहुजा यांच्या काकांनी आनंद नामक व्यक्तीच्या व्हॉटस्ॲप कोटेशन व रक्कम याची माहिती पाठविली. त्यावर आनंदने काकांच्या व्हॉटस्ॲपवर पेमेंट करण्यासाठी स्कॅनिंग कुपन पाठविले, तुम्ही स्कॅन करा तुम्हाला पेमेंट होवून जाईल असे सांगितले. नेटवर्क प्रॉब्लेम असल्याने मनिषचा मावस भाऊ चिराग गेही याच्या गुगल पे द्वारे कोड स्कॅन केला असता चिरागच्या बँक अकाऊंटमधून २४ हजार ९९९, १६ हजार ९९९ आणि ४ हजार ३०० असे एकुण ४६ हजार २९८ रूपये खात्यातून परस्पर काढून घेतले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मनिष आहुजा यांनी शहर पोलीस ठाण्यात हकीकत सांगितली. अहुजा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.