जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात सध्या गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यातच थंडी जास्त असल्याने रूग्ण संख्येत अधिक प्रमाणावर वाढत होत आहे. ढगाळ वातावरणासोबत थंडीचे दिवस असल्याने आजाराची लक्षणे जाणवताच संबंधित व्यक्तीने तातडीने जिल्हा रूग्णालयात वैद्यकिय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आज १६ डिसेंबर रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी केले आहे.
तसेच कोरोनाच्या काळात याची नागरीकांना खबरदारी घ्यावी. थंडीमुळे सर्दी, खोकला, दम्याचे आजार, टी.बी. आजाराची लक्षणे जणवत असतील तर अश्यांनी तातडीने जिल्हा शासकीय रूग्णांलयात येवून वैद्यकिय अधिकारी यांचा सल्ला घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी केले आहे. तसेच सध्या कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. थंडीमुळे हे रूग्ण अधिक प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक नागरीकांने गर्दी जाणे टाळणे, तोंडावर मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवून आपली दैनंदिन कामे करावे असे आवाहन करण्यात आले आहे.