यावल – तालुक्यातील विविध गावांमध्ये पंचायत समितीच्या माध्यमातुन रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामांमध्ये मोठया प्रमाणावर भ्रष्ठाचार झाल्याच्या तक्रारी झाल्याने या तक्रारींची तात्काळ चौकशी करून कार्यवाही करण्याच्या आदेश रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी प्रसाद मते यांनी गटविकास अधिकारी यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केल्या आहेत.
या संदर्भात प्रसाद मते यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की यावल तालुक्यातील उंटावद , पिळोदा , मनवेल , निमगाव , राजोरा , अंजाळे , वाघळुद, मारूळ , सांगवी बु॥, चिखली खु॥ अट्रावल या ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजने अंतर्गत होत असलेल्या वॉल कम्पाउंड च्या बांधकाम मोठया प्रमाणावर बोगस मजुरांची नोंदणी करून निकृष्ठ कामे करण्यात येवुन भ्रष्टाचार होत असल्याच्या लिखित तक्रारी यावल तालुक्यातुन सामाजिक संघटनेंच्या माधमातुन करण्यात आल्या होत्या याची रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी प्रसाद मते यांनी तात्काळ दखल घेवुन यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ . निलेश पाटील यांना तात्काळ या सर्व गावांच्या कामांची त्वरित नियमानुसार मुदतीच्या आत चौकशी व कार्यवाही केल्याचा तसा अहवाल जळगाव कार्यालयास पाठवावा असे आदेशात नमुद केले आहे . रोहयोचे उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यवाहीच्या आदेश प्राप्तीने भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या बांधकाम अभीयंते तथा ठेकेदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहे .