जळगाव – मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोरच केसपेपर काढण्यासाठी ४ टेबल व कर्मचारी सकाळी ८. ३० वाजता सेवा देण्यास सज्ज असतील.
तेथून समोरील बाजूस संबंधित रुग्णसेवा देण्यासाठी डॉक्टर्स, परिचारिका, कक्षसेवक तयार आहेत. औषधी घेऊन तो पुढील दाराने मुख्य प्रवेशद्वाराकडे जाऊन बाहेर पडेल. केसपेपर काढण्याची वेळ सकाळी ८. ३० ते दुपारी १२. ३० अशी राहील. तर वैद्यकीय सेवा दुपारी १ वाजेपर्यंत राहणार आहे.
मुख्य प्रवेशद्वारासमोरील इमारतीत अपघात, दुखापती, जळीत, सर्दी-खोकला, ताप, डोळे तपासणी, नाक-कान-घसा, गर्भवती महिलांसाठीच्या सुविधा, लसीकरण, मधुमेह, हृदयरोग, बालरोग, दंतचिकीत्सा, किडनी आजार, प्राण्यांचे चावे, लहान शस्त्रक्रिया, सोनोग्राफी, अस्थिविकार, मलेरिया, डेंग्यू, फुफ्फुस संबंधित, मणका-सांध्याचे आजार, मूळव्याध आदी सुविधा नागरिकांसाठी मिळणार आहेत. तसेच, अत्यावश्यक सेवेसाठी महाविद्यालय व रुग्णालयाची रक्तपेढी देखील सज्ज झाली आहे.