जळगाव : नव्या पिढीतील तरुणांनी आपल्या अंगी असलेल्या चांगल्या गुणांची जाणीव करून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. येणारी प्रत्येक पिढी पुढच्या पिढीचे अनुकरण करत असते. त्यामुळे तुमचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा, अशी कामगिरी तरुणांनी करण्याची गरज आहे.
आयुष्यातील ध्येय हे नेहमी मोठे असावे, त्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची तयारी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी परिश्रम करून मिळवलेले यश हेच महत्त्वाचे असते, आणि त्यामुळे आई-वडील व महाविद्यालयाचे नाव मोठे होते असे प्रतिपादन रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी जी.एच.रायसोनी अॅल्युमनी फांउडेशन व जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मेनेजमेंट महाविद्यालयातील ‘नॉस्टेलजिया-2020’ या कार्यक्रमांतर्गत पदवी व पदव्युत्तर शाखेतील माजी विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन स्नेह मेळाव्यात केले.
याप्रसंगी सुरुवातीला माजी विध्यार्थ्यांच्या महाविध्यालयीन काळातील विविध उपक्रमाचे क्षणचित्रे चित्रफितीच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना दाखविण्यात आले यावेळी उपस्थित माजी विध्यार्थ्यांच्या आठवणीना उजाळा मिळाला. तसेच संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी उपस्थित माजी विध्यार्थ्यांचे स्वागत करत जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या विविध यशस्वी कार्याची माहिती देत आज महाविध्यालयाने ए ग्रेड युजीसी नॅक ऑटोनॉमस पर्यंतची मजल मारत विविध क्षेत्रात विध्यार्थ्यांना नौकरीच्या संधी मिळतील या अनुषंगाने ओद्योगिक ओरीएंटेड कोर्सेस सुरु करत अपग्रॅड, एआय अॅस्म्बली मुंबई, वाय सेंटर युएसए या विविध कंपनीसोबत करार केले आहे. तसेच फक्त नौकरी नाही तर विध्यार्थ्यामधून नवनवीन उद्योजक घडावे यासाठीही रायसोनी इस्टीट्यूट सतत कार्यरत असते असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी आजी – माजी विद्यार्थ्यामध्ये संवाद झाल्याने माजी विध्यार्थ्यांच्या विविध अनुभवाचा आजच्या महाविध्यालयीन विध्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो तसेच अॅल्युमनी नेटवर्क भक्कम होते असे सांगत माजी विध्यार्थ्यानीही पुढाकार घेवून विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे असे आवाहन केले व माजी विध्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मेनेजमेंट महाविद्यालयाचे डीन प्रा. डॉ. ए. जी. मॅथ्यू यांनी कुठ्ल्याही शैक्षणिक संस्थेला यशस्वी व्हायचे असेल तर त्यांचे अॅल्युमनी नेटवर्क भक्कम असणे गरजेचे असते तसेच कोविड- १९ च्या या आपत्तीजन्य काळात देशातील औद्योगिक क्षेत्राच्या भरभराटीसाठी ओद्योगिक क्षेत्र व शैक्षणिक संस्थांनी एकत्र येवून काम करण्याची गरज असून भारताच्या अर्थव्यवस्थेचे चित्र यानंतरच सकारात्मक होईल तसेच येणाऱ्या काळात औद्योगिक क्षेत्राबरोबर शैक्षणिक क्रांतीही घडेल असे मत त्यांनी माजी विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन स्नेह मेळाव्यात व्यक्त केले.
यावेळी रायसोनी महाविद्यालयातील म्युझिक क्लब च्या ओमप्रकाश जीवानी या विध्यार्थ्याने विविध गीते सादर करत उपस्थितांची मने जिंकलीत. काही माजी विध्यार्थ्यानी रायसोनी मंडी, नेटवर्क लंच, पिनेकल या सारख्या उपक्रमातून आमचा सर्वांगीण विकास होऊ शकला. त्याचप्रमाणे प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून नामवंत कंपन्यामध्ये करियर घडविण्याची व उद्योजक होण्याची संधी मिळाली असे मत त्यांनी व्यक्त केले.
या मेळाव्यात भारतातील विविध राज्यातील विध्यार्थ्यांसाहित आयर्लंड, युनायटेड किंग्डम्स, अब्रोड या विविध देशातील माजी विध्यार्थीही सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे समन्वय प्रा.तन्मय भाले व प्रा. सोनल पाटील यांनी केले तर सदर कार्यक्रमात सहभागी झालेल्या माजी विध्यार्थ्यांना रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रीतम रायसोनी यांनी शुभेच्छा दिल्यात.