Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

SBI व भारत पेट्रोलियमचे क्रेडिट कार्ड लाँच; ग्राहकांना मिळणार जबरदस्त फायदा

by Divya Jalgaon Team
December 16, 2020
in राज्य
0
SBI व भारत पेट्रोलियमचे क्रेडिट कार्ड लाँच; ग्राहकांना मिळणार जबरदस्त फायदा

मुंबई: एसबीआय कार्ड आणि भारत कॉर्पोरेशन लिमिटेडने एक नवीन क्रेडिट कार्ड आणले आहे. या क्रेडिट कार्डमुळे पेट्रोल-डिझेलसाठी कार्डने पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे. इंधनांवर जास्त खर्च करणाऱ्या ग्राहकांची बचत करण्याच्या उद्दिष्टानेच हे कार्ड लाँच करण्यात आल्याचे एसबीआयकडून सांगण्यात आले.

या क्रेडिट कार्डचे नाव BPCL SBI Card Octane असे आहे. या क्रेडिट कार्डमुळे भारत पेट्रोलियमचे इंधन , मॅक ल्युब्रिकन्ट, भारत गॅस यासारख्या सुविधांसाठी संकेतस्थळ आणि अ‍ॅपच्या माध्यमातून खर्च केल्यास 25 रिवार्ड पॉईंटस मिळतात.

BPCL च्या पेट्रोल पंपावर सूट

BPCL च्या पेट्रोल पंपावर इंधन किंवा ल्युब्रिकन्टसाठी खर्च केल्यास 7.25 टक्के कॅशबॅक आणि भारत गॅसच्या सुविधेसाठी खर्च झाल्यास 6.25 टक्के कॅशबॅकचा लाभ मिळेल. याशिवाय, डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि अन्य किराणा दुकानांमध्येही हे क्रेडिट कार्ड वापरल्यास सूट मिळू शकते.

BPCL SBI Card Octane कार्ड घेतल्यास ग्राहकांना देशभरातील बीपीसीएलच्या 17 हजार पेट्रोल पंपांवर त्याचा लाभ घेता येईल. प्रत्येक इंधन खरेदीवेळी ग्राहकांची बचत होईल.

स्टेट बँक आणि पेटीएमची भागीदारी

यापूर्वी एसबीआय कार्डसने Paytm सोबत भागीदारी करून Paytm SBI card आणि Paytm SBI card Select अशी दोन क्रेडिट कार्डस लाँच केली होती. ही दोन्ही व्हिसा कार्ड होती.

डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि खर्चावर अधिकाअधिक बचतीसाठी ही क्रेडिट कार्ड फायदेशीर असल्याचे स्टेट बँकेकडून सांगण्यात आले होते. यंदाच्या वर्षात एसबीआय कार्डसने IPOच्या माध्यमातून 10.355 कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे.

Share post
Tags: Credit Card LounchIndian PetroliamMarathi NewsMumbaiSBISBI व भारत पेट्रोलियमचे क्रेडिट कार्ड लाँच; ग्राहकांना मिळणार जबरदस्त फायदा
Previous Post

मुक्त विद्यापीठाच्या रिपीटर सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा २१ पासून

Next Post

विराट-अनुष्काची जोडी इन्स्टाग्रामवर सुपरहिट

Next Post
विराट-अनुष्काची जोडी इन्स्टाग्रामवर सुपरहिट

विराट-अनुष्काची जोडी इन्स्टाग्रामवर सुपरहिट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group