जळगाव – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या केंद्र असलेल्या येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सर्व वर्गातील रिपीटर विद्यार्थ्यांची परीक्षा या २१ डिसेंबरपासून ऑनलाइन होत आहे. तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यास त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर परिक्षा संदर्भातील लिंक येणार असुन एक तास ही परीक्षा राहणार आहे.
मुक्त विद्यापीठाच्या यंदाच्या सर्व प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील बी.ए., बी.कॉम.च्या विषय राहिलेल्या रिपीटर विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात ज्या आपल्या राहिलेल्या विषयासंदर्भात रिपीटर परीक्षा फॉर्म जानेवारीमध्ये भरलेले असतील अशा सर्व विद्यार्थ्यांची परिक्षा २१ डिसेंबरपासून सुरू होत आहे.
तरी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेसाठी आपल्या वेळेनुसार व विषयानुसार ऑनलाइन परीक्षा द्यावी. परीक्षा न दिल्यास विद्यार्थी स्वतः जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी, असे आदेश येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील केंद्रातून काढण्यात आले आहे. प्रत्येक विद्यार्थ्यास त्याने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर परीक्षा संदर्भातील लिंक देण्यात येणार आहे, असे आवाहन येथील केंद्र प्रमुख तथा प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे, केंद्र संयोजक व उपप्राचार्य ए.पी. पाटील, केंद्र सहाय्यक एस.आर. ठाकूर, एम.पी. बोरघडे आदींनी केले आहे
ऑनलाइन परीक्षेकरिता सकाळी ८ ते दुपारी १ असे पाच तास तर दुपारच्या सत्राच्या परीक्षेकरिता दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत विद्यापीठाची वेबसाईट सुरू राहणार आहे. लॉगीन केल्यानंतर एक तास विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यास मिळणार आहे. त्यामुळे या दोन सत्रातील प्रत्येकी पाच-पाच तासांत विद्यार्थी आपल्या सवडीनुसार एक तास परीक्षा देवू शकतो.