यावर्षीच्या इन्स्टाग्रामवरील प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाची यादीत जाहीर झाली आहे. ग्लोबल इन्फ्युएन्सर्सच्या यादीत हिंदुस्थानी क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या जोडीने स्थान मिळवले आहे. विराट 12व्या तर अनुष्का 25व्या क्रमांकावर आहे.
हाईप ऑडिटर ही ग्लोबल डेटा कलेक्शन अँड अॅनालिसिस करणारी एजन्सी आहे. हाईप ऑडिटरने एक हजार इन्स्टाग्राम अकाऊंट्सचे रँकिंग केले आहे. 2020 साली इन्स्टाग्रामवरील प्रभावशाली व्यक्तींची यादी घोषित केली आहे. त्यामध्ये पहिल्या स्थानावर प्रसिद्ध फूटबॉल स्टार क्रिस्टियानो रोनाल्डो आहे. या जागतिक यादीत टॉप रँकिंग मिळवणारा विराट हा पहिला हिंदुस्थानी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19व्या स्थानावर आहेत.
सोशल मीडियावर विरुष्का ही पॉवरफुल सेलिब्रिटी जोडी मानली जाते. विराट- अनुष्का दोघांचे इन्स्टाग्रामवर अंदाजे 12 कोटी 40 लाख फॉलोअर्स आहेत. कतरिना कwफ आणि दीपिका पदुकोण या दोघी बॉलिवूड अभिनेत्रींनी पहिल्या 50 यादीत स्थान मिळवले आहे. त्या अनुक्रमे 43 व्या आणि 49 व्या स्थानावर आहेत. जे सेलिब्रेटी जागरुकता, सशक्तीकरण, प्रेरणा आणि सोशल मीडियावरील उपस्थिती या गोष्टींचा इन्स्टाग्रामवर परिणाम करतात, त्यांची नावे या यादीत आहे.


