जळगाव – राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे गिरणा पाटबंधारे विभागातील एरंडोल उपविभागामधील नागदुली सिंचन शाखेतील कालवा निरीक्षक किशोर धनराज पाटील यांना कृषिमित्र पुरस्कार जाहीर झाला आहे.
किशोर पाटील यांनी त्यांच्या उल्लेखनीय कार्याची माहिती देताना सांगिलते की, सन 2017/18 मध्ये पाणी वापर संस्था क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल वाघाड प्रकल्पस्तरीय संस्थेस दुस-या क्रमाकांचा राष्ट्रीय पाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
वाघाड प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी किशोर पाटील यांनी अतोनात मेहनत घेऊन पाणी वापर संस्था तयार केली.त्यांना स्थानिक शेतकरी भरत कावळे आणि बापू उपाध्ये यांची मदत मिळाली.
पाणी वापर संस्थेमुळे सिंचनाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली. सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने उत्कृष्ट सिंचन व्यवस्थापनाची दखल घेत सन 2019 मध्ये उत्कृष्ट पाणी वापर संस्था राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव केला.
वाघाड प्रकल्प
केंद्र शासनाच्या जलशक्ती विभागाने वाघाड प्रकल्पास पाणी वापर संस्था या प्रकारातील क्र. २ चा राष्ट्रीय पुरस्कार घोषित केला.त्यानिमित्त अनेक मान्यवरांनी वाघाड प्रकल्प स्तरीय संस्थेचे,शेतकरी सभासदांचे, कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
सहभागी सिंचन व्यवस्थापनाचा अर्थात सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा आदर्शव्रत मार्ग दाखविणारे स्व.बापूसाहेब उपाध्ये, भरत कावळे व राजाभाऊ कुलकर्णी यांच्या कृतीचा तसेच पावासं सक्षम व्हाव्यात, म्हणून तांत्रिक मार्गदर्शन करणारे शासनाचे विविध स्तरावरील अभियंते, संस्थेला सतत प्रोत्साहन देणारे डॉ. संजय बेलसरे आदींचे त्यांनी आभार मानले.
किशोर पाटील हे सध्या एक वर्षापासून नागदुली येथे कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत. ते जलक्रांतीसाठी जनहितार्थ जनचळवळ राबवताय. ते सूक्ष्म सिंचन, पाणी व्यवस्थापन, पाण्याचा काटेकोरपणे वापर याबाबत गिरणा नदीच्या डाव्या कालव्यावरील तसेच नदीवरील शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करुन योग्य प्रकारे नियोजन करीत आहेत.
त्यासाठी जलपूर्णभरणाचे काम हाती घेवून ते जनजागु्ती करीत आहेत. ते कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. या उल्लेखनीय कार्याची दखल घेवून त्यांना कु्षीमित्र पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण लवकरच होईल, असे संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ.बापुसाहेब सुमित पाटील सर यांनी जाहीर केले.
किशोर पाटील यांनी केलेल्या शेतकरी व समाजहिताच्या कार्यास राजनंदिनी परिवारातर्फे मानाचा मुजरा…!