जळगाव- राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे वडली येथील साई अँग्रो एजन्सीचे संचालक अनिल वाणी यांना कृषिमित्र पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण लवकरच करण्यात येईल, असे संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ यांनी सांगितले.
अनिल वाणी व त्यांचे बंधू भरत पंडित वाणी हे साई अँग्रो एजन्सीच्या माध्यमातून सन 1998 पासून शेतकऱ्यांच्या सेवेत आहेत. आज ते बऱ्याच कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, पेस्टासाइडची सेवा पुरवतात. त्यांनी जैन ठिबकच्या अधिकु्त एजन्सीद्वारे सिंचनसह इतर नवनवीन अद्ययावत सेवा शेतकऱ्यांना उपलब्ध केली आहे. वाणी बंधू यांनी त्यांच्या शेतातही नावीन्यपूर्ण प्रयोग करुन भरघोस उत्पन्न घेत इतरांसमोर प्रेरणादायी यशोगाथा निर्माण केली. तसेच ते अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन संबंधितांना योग्य मार्गदर्शन करीत आहेत.
त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना उत्तमरित्या शेती करुन विक्रमी उत्पन्न घेण्यास मदत होते. त्यांचे सामाजिक व शेतकऱ्यांसाठीचे उल्लेखनीय कार्य लक्षात घेता त्यांना लवकरच पुरस्कार वितरण करुन सन्मानित करण्यात येईल असे संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ जळगाव .बापुसाहेब सुमित पाटील सर वावडदा यांनी कळले आहे