मेष : कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने आजचा दिवस आपल्याला अनुकूल आहे.आजचा दिवस खरेदीसाठी अनुकूल आहे. आपले ध्येय पूर्ण करण्याच्यादृष्टीने संयमाने निर्णय घेण्याचा प्रयत्न करावा. घाईगडबडीने कोणतेही काम करु नये.
वृषभ : भावडांशी मतभेद् टाळावेत. अचानक धनलाभाची शक्यताआहे. सरकारी वास्तू व वाहनाचे योग येतील. सार्वजनिक कामातून आपला नावलौकीक वाढेल.
मिथुन : कुटुंबातीलव्यक्तीचा सल्ला घ्या. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे. घरात मंगलकार्याची नांदी होईल. गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून चांगले लाभ घडून येतील.
कर्क : आपल्या आवडत्या छंदास व्यावसायिक स्वरुप देण्यास योग्य काळ आहे. धाडसी निर्णय घेतले जातील.
सिंह : आपल्या घरी संतसज्जनांचा सहवास लाभेल. आर्थिक बाबतीत चिंतेचे कारण गनसले तरी आज खर्चावर नियंत्रण हवेच. आश्वासने देण्याचे शक्यतो टाळावेत.
कन्या : आपले निर्णय योग्य ठरतील. आज आपण प्रवासयोगटाळावेत. व्यवसाय उद्योगासाठीची कर्ज प्रकरणे मंजूर होतील. संशोधनपर अभ्यासक्रमाची पूर्तता होईल.
तूळ : आपली मते इतरांनापटवून देण्यात यशस्वी व्हाल. अवाजवी धाडस करण्याचे टाळावे. स्वसंपादीत धनाचा उपभोग घेता येईल. समाधान लाभेल.
वृश्चिक : व्यवसायानिमित्त पूर्वी ठरविलेल्या अपेक्षित गाठीभेटी पार पडतील व त्यातून आपले ध्येय साध्य होईल. जुने मित्र भेटतील त्यांच्या बरोबर आनंद लुटण्याचे क्षण येतील. करमणुकीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्याल.
धनू : आज आपली कामे विनासायस पूर्ण होतील. संतसज्जनांचा सहवास लाभेल. व्यवसाय उदयोगातील आर्थिक उलाढालीआज टाळाव्यात. पूर्वीच्या मिळालेल्या कामतील ऑर्डर्स वाढविल्या जातील. आपल्या अधिकार कक्षेत वाढ होऊन एखादी सवलत मिळेल.
मकर : संततीच्या उत्कर्षाच्यादृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे. आपल्या तब्येतीच्या तक्रारी राहतील; ताबडतोब औषधोपचार करा. वाहने चालविताना सावधगिरी बाळगा. नोकरी व्यवसायात स्थिरता लाभेल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. हातून पुण्यकर्म घडेल.
कुंभ : आज आपल्याला गुंतवणूकीचे योग येतील. शांतवृत्तीने निर्णय घेतलेत तर सर्व कामेयोग्य रीतीने पार पडतील. मोठय़ा प्रमाणावर व्यवसायातील आर्थिक उलाढाली करताना नवीन उपक्रमांची अंमलबजावणी मात्र तूर्त पुढे ढकलावी.
मीन : आजचा दिवस आपल्याला नोकरीतीलकामानिमित्त परदेशप्रवासास जाण्यास अनुकूल आहे. आजचा दिवस विशेष भाग्यकारक घटनांचा आहे. प्रियव्यक्तीच्या सहाय्याने व्यवसायात भरभराट घडवून आणेल. नोकरीत आपल्या अधिकार कक्षेत वाढ होईल.