जळगाव- मराठा स्पोर्टस् फाउंडेशन संचलित जिल्हा मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा 2021 (MPL) यंदा चौथ्या वर्षी 13 ते 24 जानेवारी दरम्यान सागर पार्कवर होणार असल्याची माहिती आयोजकांतर्फे आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या स्पर्धेत 36 संघाचे खेळाडू खेळतील तसेच या स्पर्धेचे ब्रँड अँम्बेसेडर विशेष सरकारी वकील व पद्मश्री अँड.उज्वल निकम आहेत,अशी माहिती यावेळी मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे मुख्य प्रायोजक व श्री स्वामी समर्थ फाउंडेशनचे चेअरमन मनोज पाटील यांनी दिली.
या स्पर्धेच्या माध्यमातून उत्क्रुष्ट खेळाडूंना पुढील मोठ्या स्पर्धेला संधी प्राप्त होते. तसेच मागील स्पर्धेतील संघाना गड, किल्ले, शिवरायांचे सेनापती, संतांचे नाव देण्यात आले होते. यातून इतिहासाची आवड निर्माण होऊन एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न झाला.
तसेच मराठा समाजातील गरजू बांधवांना दात्यांकडून मदतीचा हातभार लावला जातो.
या स्पर्धेत असंख्य समाजबांधवांचा उत्फूर्त सहभाग असतो, अशी माहिती, श्रीराम उद्योग समूहाचे चेअरमन श्रीराम पाटील, पाटील बायोटेकचे संचालक प्रमोद पाटील, सातपुडा अॉटो मोबाइलचे संचालक किरण बच्छाव यांंनी दिली.
या स्पर्धेत सहभागाचे आवाहन हिरेश कदम, विजय मराठे, मु्दुल अहिरराव, शेखर देशमुख आदींनी केले. या वेळी भरत कर्डिले, विजय देसाई, वासुदेव पाटील, राहुल अकोलेकर आदी उपस्थित होते.