Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

वाहन कर, पर्यावरण कर थकीत वाहनांचा 22 डिसेंबर रोजी होणार लिलाव

by Divya Jalgaon Team
December 15, 2020
in जळगाव
0

जळगाव – उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायुवेग पथकाने वेळोवेळी विविध गुन्ह्याखाली अटकवून ठेवलेल्या वाहनांच्या वाहन मालकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोचदेय डाकेने नोटीस पाठविण्यात आलेली आहे. मोटार वाहन कायदा कलम 1988 मधील तरतूदीनुसार वाहन मालकांनी पत्त्यातील बदल नोंदणी प्राधिकाऱ्यास कळविणे बंधनकारक असूनही वाहनांच्या मालकांनी कळविलेले नाही.

वाहनांच्या मालकांनी, ताबेदारांनी, वित्तदात्यांनी कार्यालयात थकीत कर, पर्यावरण कर, शासकीय दंडाच्या रक्कमेचा भरणा करुन वाहने सोडवून घ्यावीत, त्यांना लिलावास हरकत घ्यावयाची असल्यास दिनांक 19 डिसेंबर, 2020 पर्यंत लेखी हरकत घ्यावी, अन्यथा त्यांच्या वाहनांचा लिलाव दिनांक 22 डिसेंबर, 2020 रोजी दुपारी 4 वाजता करण्यात येईल. असे श्याम लोही, कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.

लिलावात सहभागी होणाऱ्या व्यक्तींनी एकूण 20 स्क्रॅप वाहनांकरीता डिमांड ड्राप्ट बंद लिफाफ्यात दिनांक 22 डिसेंबर, 2020 रोजी सकाळी 12 वाजेपर्यंत कार्यालयात जमा करावा. धनाकर्ष (डिमांड ड्राफट) हा Dy RTO, Jalgaon (Payable at SBI Main Branch, Jalgaon) या नावे अंदाजित 20 वाहनांच्या बोली रकमेचा सी.टी.एस मानंकाप्रमाणे नावनोंदणी करुन मंगळवार, दिनांक 22 डिसेंबर, 2020 रोजी जमा करणे आवश्यक आहे. लिलावाकरिता एकदा जमा केलेला डीडी कोणत्याही कारणास्तव परत केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, सोबत शॉप ॲक्ट लायसन्स, जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र व आधारकार्ड ची प्रत सादर करणे आवश्यक आहे.

लिलावात सहभागी झालेल्या व्यक्तीसमोर लिलावाच्या दिवशी सर्वासमक्ष जमा झालेले बंद लिफाफ्यातील डिमांडड्रॉफ्ट खुले करण्यात येतील. ज्या व्यक्तीने सर्वाधिक किमतीचा डिमांडड्रॉफ्ट जमा केला असेल त्याच खरेदीदारास ते वाहन लिलावाव्दारे विक्री करण्यात येईल.

जाहिर लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे मंगळवार, दिनांक 22 डिसेंबर, 2020 रोजी 4 वाजता ठेवण्यात आलेला आहे. अटकवून ठेवलेल्या वाहनांची यादी व स्थळ, लिलावाच्या अटी व शर्ती कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रदर्शित करण्यात येईल, कोणतेही कारण न देता जाहिर लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी स्वत:कडे राखून ठेवले आहे. असे श्याम लोही, कराधान प्राधिकारी, तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share post
Tags: Divya JalgaonJalgaon Latest NewsJalgaon Marathi NewsJalgaon newsपर्यावरण कर थकीत वाहनांचा 22 डिसेंबर रोजी होणार लिलाववाहन कर
Previous Post

18 डिसेंबर अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्याचे आवाहन

Next Post

भडगाव तालुक्यात वडगाव येथे आढळला बालकाचा मृतदेह

Next Post
सख्खा काकानेच केली तीन वर्षाच्या बालकाची हत्या

भडगाव तालुक्यात वडगाव येथे आढळला बालकाचा मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group