जळगाव – अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्यादींचे संवर्धन करता यावे, तसेच याबाबतच्या वैशिष्ट्यांची प्रभावीपणे अभिव्यक्ती करता यावी. यादृष्टीने प्रयत्न करण्याबाबत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने सूचना दिल्या असून दिनांक 18 डिसेंबर, 2020 हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत राबविण्यात येतो.
अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव/माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळांमध्ये यावर्षी कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत अल्पसंख्याकांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रसिध्दी व्याख्याने, चर्चासत्रांद्वारे ऑनलाईन/वेबिनार इत्यादीमार्फत करावी.
कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनांच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन Online/वेबिनार इत्यादी व्दारा जास्तीत जास्त व्याख्यानमाला, परिसंवाद, चर्चासत्र इ. कार्यक्रम आयोजित करण्यात यावे. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये आवाहन केले आहे.