भडगाव, प्रतिनिधी । सतीचे वडगाव येथील प्लॉट भागात ३ वर्षाच्या बालकांचे अपहरण झालेले असतांना त्या बालकांचा मृतदेह वडगाव विद्यालयाजवळ असलेल्या एका शेतातील विहिरीतजवळ आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील वडगाव बु. येथील भिल्ल समाजाच्या कुटुंबातील दिपक गायकवाड यांचा मुलगा आयुष दिपक गायकवाड (वय ३ वर्ष रा. वडगाव) सतीचे हा मुलगा वडगाव सतीचे येथुन दि. १४ डिसेंबर रोजी दुपारी ३.०० वाजेच्या सुमारास हरवला होता. याबाबत भडगाव पो. स्टे.ला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या बालकाचा मृतदेह वडगाव विद्यालया लगत असलेल्या दिलीप जाधव यांच्या शेतातील विहीरीत आढळुन आल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. बालकाचा मृत्यूबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या बालकाचा मृत्यू कसा झाला ? मृत्यूचे कारण अद्यापावेतो अस्पष्ट जरी असले तरी सशंयित म्हणुन पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. याबाबत पुढील तपास भडगाव पोलिस करीत आहे. घटनास्थळी पाचोरा विभागाचे डी. वाय.एस. पी. ईश्वर कातकडे, भडगाव पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांच्यासह पो. हे. कॉ. कैलास गिते, पो. ना. लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, स्वप्निल चव्हाण, नितिन रावते यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.