Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

नवी पेठेतील जुनी बॉम्बे लॉजिंगमधील जुगार अड्ड्यावर धाड

by Divya Jalgaon Team
December 15, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
नवी पेठेतील जुनी बॉम्बे लॉजिंगमधील जुगार अड्ड्यावर धाड

जळगाव- सोमवारी रात्री नवी पेठ परिसरातील जुनी बॉम्बे लॉजिंगच्या बेसमेंटमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने  धाड टाकून १९ जणांना ताब्यात घेतले. तसेच घटनास्थळावरून २ लाख १० हजार ९४० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकातील प्रो.डीवायएसपी नितीन गणपुर, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र मोतीराया, सहाय्यक फौजदार विनयकुमार देसले, पोलीस कॉन्स्टेबल अशोक भुसे यांना गुप्त माहिती मिळाली होती की, शहरातील जुने बॉम्बे लॉजिंग बेसमेंटमध्ये हारजीतवर जन्ना-मन्ना नावाचा जुगाराचा खेळ सुरू आहे.

या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने रात्री आठ वाजेच्या सुमारास धाड टाकली. यावेळी विकास रमेश सोनवणे (रा.  शनिपेठ), फिरोज गुलाब पटेल (रा.  संदांशिव नगर), हेमंत रमेश शेटे (रा.कांचन नगर), अनिल रामभाऊ खाडेकर (रा.शिवाजीनगर), अशोक ओंकार चव्हाण (रा.केसी पार्क), घनश्याम लक्ष्मणदास कुकरेजा (रा.सिंधी कॉलनी), अनिल भिमराव ढेरे (रा.लक्ष्मीनगर), पंढरी ओमकार चव्हाण (रा.त्रिभुवन कॉलनी), रायचंद लालचंद जैन (रा.गणपती नगर जळगाव रोड, जामनेर), रामदास दगडू मोरे (रा.शाहूनगर), नितीन परशुराम सूर्यवंशी (रा. हरीओम नगर), नजीर शफी पिंजारी (कोळी पेठ), पंकज वामन हळदे (चौगुले प्लॉट, शनिपेठ) आसिफ अहमद खाटिक (रा.पिंप्राळा हुडको ),ब्रिजलाल आनंदराम वालेचा (रा.लक्ष्मी नगर पंचमुखी हनुमान मंदिराजवळ), मोहम्मद सलीम मोहम्मद इस्माईल (रा.इस्लामपुरा भवानीपेठ), सलीम खान मुसाखान (रा.शिवाजीनगर), नूरा गुलाम पटेल (रा.सुरेशदादा जैन नगर), पवन गुरुदासराम लुल्ला (रा.सिंधी कॉलनी) अशांना पोलीस पथकाने ताब्यात घेतले.

या सर्व जणांकडून रोख रुपये, मोबाईल मोटारसायकल तसेच जुगाराचे साहित्य मिळून आले. यासंदर्भात मुंबई जुगार कायदा कलम ४५ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम २,३,४ चे उल्लंघन करून लॉकडाउनच्या नियमांचे पालन न करता कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढेल असे वृत्त केले म्हणून १८८, २६९, २७०, या कलमान्वये पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share post
Tags: crimeDivya JalgaonJalgaon newsMarathi Newsनवी पेठेतील जुनी बॉम्बे लॉजिंगमधील जुगार अड्ड्यावर धाड
Previous Post

राष्ट्रवादी कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

Next Post

गॅस सिलेंडरच्या दरात वाढ ; ग्राहकांच्या खिशावर डल्ला!

Next Post
सर्वसामान्यांना फटका ! घरगुती गॅसच्या दरात ७५ रुपयांची दरवाढ

गॅस सिलेंडरच्या दरात वाढ ; ग्राहकांच्या खिशावर डल्ला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group