जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादी कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मुतीदिनानिमित्ताने प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. शेतकऱ्यांनी नवीन पद्धतीने शेती करावी यासाठी पुस्तकाची भेट देण्यात आली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मुतीदिनानिमित्ताने शेतकऱ्यांनी नवीन पद्धतीने शेती करावी याकरिता शेती विषयक पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
तसेच राष्ट्रवादी पक्षाचे नवीन वर्षाची दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे हाजी गफ्फार मलिक, वाय. एस. महाजन सर, जयश्री पाटील, अशोक लाडवंजारी आदी उपस्थित होते.