Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी 28 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

by Divya Jalgaon Team
December 15, 2020
in जळगाव, प्रशासन
0
नव्याने दाखल होणाऱ्या बंद्यांसाठी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात तात्पुरते कारागृह

जळगाव – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगावमार्फत जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटु, क्रीडा मार्गदर्शक, यांच्या कार्यालयाचे/योगदानाचे मूल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा, प्रोत्साहन मिळावे व क्रीडा क्षेत्राच्या विकासाला चालना मिळावी. या उद्देशाने देण्यात येणारा जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2020 साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी दिनांक 1 जुलै, 2010 ते दिनांक 30 जुन 2020 या कालावधीतील कामगिरी ग्राह्य धरली जाईल तर गुणवंत खेळाडू पुरस्कार एक महिला खेळाडू, एम पुरुष खेळाडू, एक दिव्यांग खेळाडू, एक दिव्यांग खेळाडू थेट पुरस्कार देण्यात येईल. याकरीता दिनांक 1 जुलै, 2015 ते दि. 30 जुन, 2020 या कालावधीतील कामगिरी ग्राह्य धरली जाईल.

या व्यतिरीक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंना शासन निर्णयानुसार थेटचे पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कारार्थी यांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह, व रोख रुपये दहा हजार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.  सन 2020 च्या पुरस्काराकरीता दि. 30 जुन, 2020 पर्यंतची कामगीरी/कार्य ग्राह्य धरण्यात येईल.

ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी दि. 14 ते 28 डिसेंबर, 2020 पर्यंत आहे. अर्जदाराने ऑनलाईन हार्ड कॉपी कार्यालयात सादर करण्याचा दिनांक 28 डिसेंबर, 2020 पर्यंत असून ऑनलाईन अर्ज भरण्याची वेबसाईट Jalgaonsports.in अशी आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अधिक माहितीकरीता श्रीमती सुजाता गुल्हाने मो. नं. 9763231146 यांचेशी संपर्क साधवा. विहित नमुन्यातील अर्ज, पुरस्काराच्या अटी व शर्तीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. विहित मुदतीत प्रस्ताव अर्जदाराने Jalgaonsports.in या वेबसाईटवर जावून ऑनलाईन पध्दतीने भरुन सर्व कागदपत्राची हार्ड कॉपी कार्यालयीन वेळेत सादर करावी. असे आवाहन मिलींद दिक्षीत, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Share post
Tags: Collector OfficeJalgaonJalgaon newsMarathi Newsजिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी 28 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
Previous Post

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातंर्गत अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Next Post

राष्ट्रवादी कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

Next Post
राष्ट्रवादी कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

राष्ट्रवादी कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group