Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

गॅस सिलेंडरच्या दरात वाढ ; ग्राहकांच्या खिशावर डल्ला!

by Divya Jalgaon Team
December 15, 2020
in राज्य
0
सर्वसामान्यांना फटका ! घरगुती गॅसच्या दरात ७५ रुपयांची दरवाढ

मुंबई : ऑईल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीमध्ये मोठी वाढ केली आहे. 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढविली आहे. तर 5 किलोग्रॅम छोट्या सिलेंडरच्या किंमतीत 18 रुपयांची वाढ करत सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर अक्षरश: डल्ला मारला आहे.

तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलेंडरचे दर ठरवितात. प्रत्येक राज्यात कर वेगवेगळा असल्याने त्यानुसार गॅस सिलेंडरच्या दरात फरक असतो. नेहमी प्रमाणे 1 डिसेंबरलाही गॅस कंपन्यांनी दराचा आढावा घेतला होता. यानुसार घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात नोव्हेंबरच्या किंमतीत काही बदल करण्यात आलेला नव्हता. पण आज अचानक दरवाढ करण्यात आली.

तर व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार 14.2 किलोचा सबसिडी नसलेला गॅस सिलेंडर दिल्लीमध्ये 594 रुपये होता. तर बेकरी हॉटेलसारख्या आस्थापनांमध्ये वापरण्यात येणारा कमर्शिअल गॅस सिलेंडरचा दर 55 रुपयांनी वाढविण्यात आला होता.

मात्र, 15 दिवसांनी पुन्हा तेल कंपन्यांनी गॅसचे दर वाढविले आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करतानाच अन्य प्रकारातील सिलेंडरच्या किंमतीतही वाढ केली आहे. 19 किलोच्या गॅस सिलेंडरच्या दरात 36.50 रुपयांची वाढ केली आहे. दिल्लीमध्ये सबसिडी नसलेल्या घरगुती सिलेंडरची किंमत 644 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये ही किंमत 670.50 रुपये, मुंबईत 644 रुपये आणि चेन्नईमध्ये 660 रुपये झाली आहे.

याआधी इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार 14.2 किलोचा सबसिडी नसलेला गॅस सिलेंडर दिल्लीमध्ये 594 रुपये होता. कोलकातामध्ये 620.50 रुपये, मुंबईत 594 रुपये आणि चेन्नईत 610 रुपये होता. तर कमर्शिअल गॅस सिलेंडरचा दर वाढविण्यात आला आहे. चेन्नईत हा दर वाढून 1410 रुपये झाला आहे. दिल्लीमध्ये 55 रुपयांनी वाढून 1296 रुपये, कोलकातामध्ये 55 रुपयांनी वाढून 1351रुपये आणि मुंबईत देखील 55 रुपयांनी वाढून 1244 रुपये झाला आहे. सध्या केंद्र सरकार एका कुटुंबाला वर्षाला 12 सिलेंडर सबसिडीवर देते. त्यापेक्षा जास्त सिलेंडर हवा असल्यास बाजारभावाने तो घ्यावा लागतो. ही किंमत दर महिन्याला आंतरराष्ट्रीय बाजारानुसार ठरविली जाते.

Share post
Tags: GAsLPGMarathi NewsMumbaiRAteगॅस सिलेंडरच्या दरात वाढ ; ग्राहकांच्या खिशावर डल्ला !
Previous Post

नवी पेठेतील जुनी बॉम्बे लॉजिंगमधील जुगार अड्ड्यावर धाड

Next Post

शिवाजी नगरात दुचाकींसह दोघे चोरट्यांना अटक

Next Post
बेकायदेशीर गावठी बनावटीची दारू तयार करणारी महिला अटकेत

शिवाजी नगरात दुचाकींसह दोघे चोरट्यांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group