Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यातील 1515 रिक्त पदांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

by Divya Jalgaon Team
December 15, 2020
in जळगाव
0
सुझुकी मोटार कंपनीतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव – कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्यावतीने राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

नवाब मलिक, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मंत्री यांच्या निर्देशानुसार मेळाव्याची मुदत 20 डिसेंबर, 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातील नामांकित उद्योजकांनी सहभाग नोंदवुन सुमारे 75 हजार ऑनलाईन रिक्तपदे अधिसुचित केलेली आहे. तर जळगाव जिल्ह्यातील 14 उद्योजकांनी सुमारे 1515 रिक्तपदे या मेळाव्यासाठी अधिसुचित केलेली आहेत.

जिल्ह्यातील एस.एस.सी, एच.एस.सी, आय.टी.आय, पदवीधर, डिप्लोमा इ. विविध पात्रता धारण केलेल्या इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी या विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या वरील रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवर्डने लॉगइन होऊन ॲप्लाय करावे. तसेच ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी वरील वेबसाईटवर नोंदणी करुन अॅप्लाय करावे.

याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 0257-2239605 वर संपर्क करावा. जॉब व्हॅकेंसीजबाबत दररोज माहिती अपडेट करण्यात येत असल्याने उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या कालावधीत दररोज माहिती बघावी. हा मेळावा ऑनलाईन असल्यामुळे उमेदवारांनी या कार्यालयात किंवा नियोक्त्याकडे प्रत्यक्ष उपस्थित राहून गर्दी करु नये, असे आवाहन श्रीमती अनिसा तडवी, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Share post
Tags: Divya JalgaonJalgaonMarathi NewsRojgar Melavaऑनलाईन रोजगार मेळाव्याजिल्ह्यातील 1515 रिक्त पदांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजनरोजगार
Previous Post

बीएचआर प्रकरणी सीए जैनच्या जामीनावर २३ रोजी सुनावणी

Next Post

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध योजनांच्या लाभासाठी 8 जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Next Post

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध योजनांच्या लाभासाठी 8 जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group