Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध योजनांच्या लाभासाठी 8 जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

by Divya Jalgaon Team
December 15, 2020
in जळगाव
0

जळगाव, – भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वागीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. या असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करणे आवश्यक असते. त्यानुसार सन 2020-21 साठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना www.rrrlf.gov.in  या प्रतिष्ठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी तो या संकेतस्थळावरुन उपलब्ध (download) करुन घ्यावा. असे आवाहन ग्रंथालय संचालक, शा. गो. इंगोले यांनी केले आहे.

असमान निधी योजना सन 2020-21 साठी (Non Matchings Sehemes) ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य, “ राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा” विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य, महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य, राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य, बाल ग्रंथालयासाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान “ बाल कोपरा” स्थापन करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते.

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांबाबत इच्छुकांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे. उपरोक्त योजनेचा लाभ घेण्यासाठी सादर करण्यात येणाऱ्या अर्जाचा नमुना सुधारित स्वरुपात असावा. अर्जामध्ये नमूद केलेल्या आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह इंग्रजी/हिंदी भाषेमधील परिपूर्ण प्रस्ताव चार प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी, कार्यालयास दि. 8 जानेवारी, 2021 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत. असे आवाहन श्रीमती शालिनी गो. इंगोले, ग्रथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य नगर भवन, मुंबई यांनी सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना केले आहे.

Share post
Tags: Divya JalgaonJalgaonJalgaon newsMarathi Newsराजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध योजनांच्या लाभासाठी 8 जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
Previous Post

जिल्ह्यातील 1515 रिक्त पदांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Next Post

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातंर्गत अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Next Post
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातंर्गत अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातंर्गत अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group