Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

राज्यात नववी ते बारावीच्या 70 टक्के शाळा सुरू

by Divya Jalgaon Team
December 15, 2020
in जळगाव, शैक्षणिक
0
महत्वाची बातमी : दहावी, बारावीच्या परीक्षांवर कोरोनामुळे संकट येणार

मुंबई – राज्यात नववी, दहावी आणि बारावीच्या शाळा सुरू होऊन महिना पूर्ण होण्याआधीच विद्यार्थ्यांचा हजेरीपट 10 लाखांच्या वर गेला आहे. 23 नोव्हेंबरला शाळेच्या पहिल्या दिवशी तीन लाख विद्यार्थी हजर होते. सोमवारी दहा लाखांचा टप्पा पार करीत तब्बल 10 लाख 72 हजार 490 विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदवली आहे. तर सुरू झालेल्या शाळांची संख्याही आता दुप्पट झाली असून राज्यभरातील 16 हजार 620 शाळा विद्यादानाचे काम करीत आहेत.

कोल्हापूर जिह्यात सर्वाधिक हजेरी

सोलापूर जिह्याला मागे टाकत कोल्हापूर जिह्यातील विद्यार्थीसंख्येचे प्रमाण वाढले आहे. 9 डिसेंबरला या जिह्यात 50 हजार 5541 विद्यार्थी हजर होते. पाच दिवसांत ही संख्या दुप्पट झाली आहे. सोमवारी जिह्यातील हजेरीचा पट 1 लाख 44 हजार 247 नोंदविला गेला. तर जिह्यातील 960 शाळा सुरू झाल्या आहेत.

23 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर या काळात राज्यातील 70 टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाणही 19 टक्क्यांवर पोहोचले आहे. 9 डिसेंबरपासून मागील पाच दिवसांत शाळेतील हजेरीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. 9 डिसेंबरला 6 लाख 4 हजार 884 विद्यार्थीसंख्या नोंदवली गेली होती तर 11 हजार 410 शाळा सुरू झाल्या होत्या. राज्यातील मुंबई व ठाणे जिह्यातील एकही शाळा अद्याप सुरू झालेली नाही.

जिह्यानिहाय सुरू झालेल्या शाळांची संख्या

जिल्हा 2 डिसेंबर 14 डिसेंबर

रत्नागिरी 345 349

सांगली 654 680

रायगड 334 349

सिंधुदुर्ग 188 197

वाशीम 346 352

कोल्हापूर 546 960

पुणे 638 721

वर्धा 307 312

धुळे 0 242

नांदेड 830 854

नागपूर 1 646

परभणी 419 528

पालघर 66 151

हिंगोली 41 41

Share post
Tags: Collaged openDivya JalgaonMumbaiSchool Openedराज्यात नववी ते बारावीच्या 70 टक्के शाळा सुरू
Previous Post

आजचे राशीभविष्य, मंगळवार, १५ डिसेंबर २०२०

Next Post

किशोर कुंझरकरांचे मृत्यूचे कारण लवकरच समोर येण्याची शक्यता

Next Post
किशोर कुंझरकर खून प्रकरणी दोघांना पुन्हा पोलीस कोठडी

किशोर कुंझरकरांचे मृत्यूचे कारण लवकरच समोर येण्याची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group