Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

किशोर कुंझरकरांचे मृत्यूचे कारण लवकरच समोर येण्याची शक्यता

by Divya Jalgaon Team
December 15, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
किशोर कुंझरकर खून प्रकरणी दोघांना पुन्हा पोलीस कोठडी

जळगाव प्रतिनिधी । आदर्श शिक्षक तथा गालापूर जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक किशोर पाटील-कुंझरकर यांच्या खुनाच्या तपासाला आता वेग आला आहे. जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर यांच्या मृत्यू प्रकरणी एलसीबीच्या पथकाने सीसीटिव्हीचे फुटेज जमा केले असून यामुळे आता हे प्रकरण लवकरच उलगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्राथमिक तपासात कुंझरकर यांना दुसर्‍या जागेवर मारहाण करून नंतर त्यांचा मृतदेह पळासदळे परिसरात आणून टाकल्याची माहिती समोर आली आहे. शवविच्छेदनाच्या अहवालातून कुंझरकर यांचा मृतदेह आढळल्याच्या ठिकाणी त्यांना मारहाण झाले नसल्याचे निष्पन्न झाले आहे. डोक्याला मागच्या बाजूस दुखापत झाली आहे. डोक्यात अंतर्गत रक्तस्राव झाला असून, यात त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे.

याबाबत अधिक तपासणीसाठी व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे किशोर पाटील कुंझरकर यांना पहाटे तीन वाजता कुणाचा तरी फोन आल्यानंतर ते घराबाहेर पडले असा दावा त्यांच्या पत्नीसह आप्तांनी केला होता; परंतु त्यांना कोणाचाही फोन आला नसल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी आपल्या सहकार्‍यांसह या प्रकरणाच्या तपासाला वेग दिला असून त्यांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासून यातून काही महत्वाचे धागेदारे जाणून घेतले आहेत. यामुळे या प्रकरणी लवकरच दोषींपर्यंत पोलीस पोहचतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Share post
Tags: #ErandolDivya JalgaonJalgaonJalgaon crime newsKishor Patil KunjharkarMarathi Newsकिशोर कुंझरकरांचे मृत्यूचे कारण लवकरच समोर येण्याची शक्यता
Previous Post

राज्यात नववी ते बारावीच्या 70 टक्के शाळा सुरू

Next Post

भारतीय रेल्वे मेगाभरती परीक्षा 15 डिसेंबरपासून तीन टप्प्यात होणार

Next Post
भारतीय रेल्वेमध्ये मेगाभरती परीक्षा 15 डिसेंबरपासून तीन टप्प्यात होणार

भारतीय रेल्वे मेगाभरती परीक्षा 15 डिसेंबरपासून तीन टप्प्यात होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group