मेष : आपल्या मित्रपरिवारांचे आपल्याला सहकार्य लाभेल. संतसज्जनांचा सहवास लाभेल. सरकार दरबारी असलेल्या कामास विलंब होण्याची शक्य आहे. मन सैरभैर होणार्या घटना घडतील.
वृषभ : आर्थिक महत्वाचे व्यवहार टाळावेत. संततीस उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करणार्यांना यश मिळेल. मनस्वास्थ लाभेल.
मिथुन : संततीसंबंधीतील गुंतवणूकीचे व्यवहार आजआपण कराल. मित्रपरिवाराबरोबर शोभेच्या वस्तूची खरेदी कराल. आज पाहुण्यांच्या स्वागतास सज्ज रहावे लागेल. पूर्वनियोजित कामात बदल करावे लागतील.
कर्क : नोकरीत सहकार्यांच्या मदतीने आपली कामे पूर्ण होतील.विद्यार्थांना शैक्षणिक प्रगतीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आपली मते डळमळीत ठेवू नका. प्रत्येक काम जबाबदारीने पार पाडा. प्रवास घडून येतील.
सिंह : आपल्या संततीच्या उत्कर्षामुळे घरातील वातावरण अनुकूलराहिल. नोकरीत भाग्यकारक घटना घडतील. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील. कुटुंबात धार्मिक शुभकार्याचे आयोजन केले जाईल.
कन्या : आपण न बोलता एखाद्या कामाची कृती केली तर त्या कामाच्या पूर्ततेमुळे आपली प्रशंसा होईल. महत्त्वाच्या निर्णयात आपला पुढाकार व सल्ला उपयोगी पडेल. विश्वासाच्या जोरावर मोठे ध्येय गाठाल.
तूळ : भागिदारी व्यवसायात आपले कार्यक्षेत्र वाढल्यामुळे भरपूर काम करावे लागेल. कामानिमित्त दूरचे प्रवास घडून येतील. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. मन सैरभैर होणार्या घटना घडतील.
वृश्चिक : आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने आपल्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. महत्वाचे पत्रव्यवहार होईल. बढती -बदलीसाठी नोकरीत केलेल्या प्रयत्नांना यश येईल. आपल्या इच्छा कृतीत येतील.
धनू : आपले मनोबल वाढणार्या शुभघटना घडतील. आज आपण छोटे प्रवास कराल आपल्या भावंडांच्या गाठीभेटी होतील. व्यवसायात चांगला उत्क र्ष साधता येईल. अपेक्षित ठिकाणी बदली झाल्याने समाधान लाभेल.
मकर : आज आपल्या जोडीदाराबरोबर आपल्याला अचानक सहलीचा योग येईल. आपल्या बुद्घीचातुर्यावर मोठी मजल माराल. व्यवसाय-उद्योगातील आत्मविश्वास व कामाचा वेग वाढेल.
कुंभ : वैवाहिक मतभेद टाळावेत. आपल्या घरी आज अचानक पाहुणे येतील. आज आपल्याला काही महत्वाची कर्तव्य पारपाडावी लागतील. अंधश्रद्धेला बळी पडू नका. कोणाकडूनही मदतीची अपेक्षा ठेवू नका. स्वावलंबी राहा.
मीन : घरात शोभेची मौल्यवान वस्तू खरेदी केलीजाईल. आपल्याला मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायीक उद्योगातील कामानिमित्त कर्ज प्रकरण रखडले असेल तर ते मार्गी लागेल. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील.