यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील पाडळसे येथील एका शेतकऱ्याचा मद्यमाशांनी केलेल्या हल्यात दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे .
पाडळसे तालुका यावल येथील राहणारे शेतकरी भागवत भास्कर काठोके हे अल्पभूधारक शेतकरी होते त्यांनी जोडधंदा म्हणून ते गाईचा व्यवसाय करायचे नेहमी प्रमाणे दि.११ डिसेंबर रोजी ते सकाळी पाडळसे शिवारातील शेता मध्ये गाई चारायला गेले असता दुपारी ३ वाजेच्या सुमारास झाडावरुन अचानक त्यांच्यावर मद्यमाश्यानी हल्ला चढवला (आगे मोहोळ)या हल्या मध्ये ते गंभीर जखमी झाले असता त्यांना पुढील उपचारासाठी भुसावळ येथे दाखल करण्यात आले होते उपचारा दरम्यान त्यांचे आज दिनांक १३ रोजी दुःखद निधन झाले भागवत काठोके है जन्मापासून मूके होते
त्यांच्या घ कुटुंबामध्ये ते एकमेव कमाविते व्यक्ती असल्याने त्यांच्या परिवारावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे . भागवत काठोके त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली एक विवाहित मुलगा व पत्नी असा परिवार आहे .
त्यांच्या कुटुंबास स्व . गोपीनाथ मुंडे अपघात योजनेतून शासनाने लाभ मिळावा अशी मागणी पाडळसा ग्रामस्था मंडळीकडून करण्यात येत आहे.