जळगाव – केसीईज आय एम आर मध्ये युवती सभेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ” सायबर सुरक्षा आणि कायदे: महिलांसाठी आवश्यक माहीती ” या विषयावर बेविनार संपन्न झाले. याप्रसंगी संस्थेच्या संचालक प्रा डॉ शिल्पा बेंडाळे यांनी प्रस्तावना करतांना सांगितले की “दिवसोदिवस वाढणारे सायबर गुन्हे हे महिला आणि विद्यार्थीनींच्या आर्थिक, सामाजिक आणि मानसिक सुरक्षेवर हावी होत आहे.. ही गरज लक्षात घेऊन आय एम आर ने युवती सभेत हा विषय उद्भोधनासाठी घेतला आहे. युवती सभा समन्वयक रुपाली सरोदे यांनी प्रमुख वक्त्यांची ओळख करून दिली.
या प्रसंगी बोलतांना प्रमुख वक्त्या अॅड डॉ विजेता सिंग म्हणाल्यात, ” संपुर्ण भारतात विषेशतः महिला आणि मुलींना हा त्रास मोठ्या प्रमाणात होतांना दिसतो आहे. त्यात हॅकिंग आणि बुलींग पासुन सायबर स्टेलींग, सायबर बदनामी, बाल अश्लीलता, सायबर बुलिंग, सायबर स्टॅकिंग, फेसबुक, वाॅट्स अप, ईमेल मधून होणारी हॅरॅसमेंट, या प्रकारांवर त्यांनी प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे चांगल्या बाजूचा उपयोग घेतांना वाईट बाजू पण समजून घेतली, तर होणारी फसवणूक टाळणे शक्य आहे.
त्यामुळे सावध व्हा आणि कुर्हाडीवर पाय ठेऊ नका. स्टेलींग मध्ये अनेक इंटरनेट आॅफर येतात, त्या कुणी पाठवल्या ते कधीच कळत नाही. सायबर डिफामेशन(बदनामी), चाईल्ड पोर्नोग्राफी, हे सर्व गंभीर गुन्हे आहेत.अनेक पुरुष आपल्या वाॅट्स अप ग्रुप मध्येही हे प्रकार करत असतात. या पध्दतीने कोणत्याही डिव्हाईसवर अश्लील पोस्ट तयार करणे, त्या पोस्ट फेसबुक, वाॅट्स अप ग्रृप, इंस्टाग्राम कींवा तत्सम ठिकाणी पोस्ट करणे, किंवा फाॅरवड करणे हा गंभीर गुन्हा आहे.
आॅनलाईन रोमान्स, चाटिंग करतांना ही काळजी घ्या, इथे तुमच्या फसगतीची मोठी शक्यता असते. मेट्रीमोनीअल साईट सुध्दा नीट चेक करुन वापराव्यात. मोबाईल वर सहज कोणत्याही गोष्टीला allow करू नका. पासवर्ड अजिबात शेअर करु नका. फोटो माॅरफिंग हा सुद्धा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. लिंक बॅटलींग चा गुन्हा समजवून सांगतांना त्यांनी “अभिमन्यू” या सिनेमाचे सुंदर उदाहरण दिले. भारतात महिलांना फसविणे हि सर्वसाधारण मानसिकता आहेच,अॅसिड अॅटॅक झाला तर तो दिसतो पण हा सायबर अॅटॅक तर डोळ्यांना दिसतही नाही. तिची मनस्थिती समजू शकत नाही तर तिला सपोर्ट कोण आणि कसा करणार? कोणत्याही वयातील स्त्रीला, चुकीच्या मानसिकतेचे लोक बळी पाडू शकतात.
त्यासाठी हे अनुभव आलेल्या स्त्रीने बोलले पाहिजे. या गंभीर गुन्ह्य़ाला सेक्शन 66अ,आय टी अॅक्ट 2000 नुसार शिक्षा होते. सुचक किंवा अश्लील मेसेज पाठवणे, सेक्शन 292 आणि 292 अ प्रमाणे एका डिव्हाईस मधुन दुसर्या डिव्हाईस मध्ये काहीही अश्लील मेसेज पाठवणे हा गंभीर गुन्हा आहे. या गुन्ह्य़ाला, तो पहिल्यांदा घडला असेल तरी 5 हजार रू शिक्षा होते. या गुन्ह्याचे स्वरुप लक्षात घेऊन 10 करोड पर्यत शिक्षा ठोठावली गेली आहे. त्यानंतर बोलताना सायबर गुन्हे तज्ञ आणि या विषयातील लेखक कविता दातार म्हणाल्यात “अजिबात लाईकच्या मोहात पडू नका.
5000 फाॅलोवर्स आहेत म्हणुन फार खुश होऊ नका.. मित्राच्या मित्राच्या मित्राला तुम्ही ओळखत नाही. फोटो बघुन अॅड करतात हे अत्यंत धोकादायक आहे. तुमच्याच नावाचे संग्दीग्ध अकाऊंट फेसबुक कोणी तयार करुन टाकलेले लक्षात आले तर फेसबूकवर रिपोर्ट करा. सायबर सेल ला कंप्लेंट करा. वेळीच सावध व्हा. अॅन्टी व्हायरस अॅप ठेवा. सिम स्वॅप, एस एम एस हॅक सारख्या गोष्टींपासून स्वताला जागरूकपणे वाचवा. लोकेशन आॅन ठेऊ नका. जागरूकपणे राहिलात तर “अॅन्टी सोशल इलिमेंट” ओळखता येतील. हे ओळखण्यासाठी त्यांनी अनेक केसेस विद्यार्थीनींना सांगितल्या.
त्यानंतर बोलताना पुणे पोलिसांमध्ये कार्यरत सायबर तज्ञ वरिष्ठ पोलिस अधिकारी दिपक लगड म्हणालेत, “पुणे शहरात 2012 मध्ये 1000 सायबर गुन्ह्य़ाची नोंद झाली होती, 2017 मध्ये 7000 सायबर गुन्हे नोंदवले गेलेत तर आता 2020 मध्ये 12000 केसेस आजवर झालेल्या आहेत. यावरुन या गुन्ह्याचे स्वरुप लक्षात येईल. पण न घाबरता महिला मुलींनी तक्रारी करण्यासाठी पुढे आले पाहिजे. पुण्यात एका 65 वर्षाच्या बाईंना नायजेरीयन फ्राॅड प्रकारातून 15 कोटी गिफ्ट पाठवतो सांगुन, 95 लाख रुपयाला फसवले गेल्याचे केस त्यांनी विस्ताराने सांगितली. मुलींना आणि महिलांना गुगलवर जाऊन मेट्रोमोनिअल फ्राॅड किंवा न्यु सायबर फ्राॅड वर जाऊन या प्रकारातील केसेस वाचण्याचा सल्ला दिला. यानंतर समन्वयक रुपाली सरोदे यांनी आभार मानले. त्यांना तंत्र साहाय्य प्रा खान, अमोल पांडे यांनी केले. ह्या बेविनारला 100 महिला आणि विद्यार्थीनींनी उपस्थिती दिली