Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

BREAKING : हिवाळी अधिवेशनात 17 जणांना कोरोनाची लागण

by Divya Jalgaon Team
December 14, 2020
in राज्य
0
BREAKING : हिवाळी अधिवेशनात 17 जणांना कोरोनाची लागण

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे दोन दिवस मुंबईत हिवाळी अधिवेशन ( winter session 2020) भरवण्यात आले आहे. परंतु, अधिवेशनापूर्व कोरोना चाचणीत (Corona Test) 17 जण पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात पोलीस कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांचा समावेश आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळातील कर्मचारी, पोलीस आणि लोकप्रतिनिधींची कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती. एकूण 2500 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. यामध्ये 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या 17 रुग्णांमध्ये पोलीस आणि कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. सुदैवाने अधिकारी, विधानभवन कर्मचारी यांचा समावेश नाही. तसंच कोरोना चाचणी केलेल्या लोकप्रतिनिधींना कोरोनाची लक्षण नसल्याचे समोर आले आहे. मागील पावसाळी अधिवेशनात 52 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.

दरम्यान, राज्य विधिमंडळाचं 2 दिवसांचं अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. असं असलं तरीही या दोन दिवसातही राज्य सरकार विरुद्ध विरोधक असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे. याची चुणूकच कालच्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या पत्रकार परिषदांमध्ये पाहायला मिळाली. राज्य सरकार गेल्या वर्षभरात कसं अपयशी ठरलं आहे याचा पाढाच देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवला. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर पलटवार केला.

त्यामुळे विधिमंडळाच्या कामकाजातही सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेले पाहायला मिळतील. आजच्या कामकाजात दोन्ही सभागृहांमध्ये संविधानाच्या उद्दिशिकेचं वाचन केलं जाणार आहे. तसंच नगरविकास, उच्च व तंत्रशिक्षण आणि सहकार विभागाचे अध्यादेश पटलावर ठेवले जातील. वर्ष 2020-2021 च्या पुरवणी मागण्या सादर करण्यात येतील. लोकलेखा समितीचा अहवाल पटलावर ठेवणं आणि काही शोक प्रस्ताव मांडल्यानंतर सभागृहाचं कामकाज समाप्त होणार आहे. या अधिवेशनात 6 अध्यादेश आणि 10 विधेयकं मांडण्यात येणार आहेत.

Share post
Tags: BREAKING : हिवाळी अधिवेशनात 17 जणांना कोरोनाची लागणCoronaMumbai
Previous Post

धनाजी नाना चौधरी महाविद्यालयात ऑनलाईन वेबिनार संपन्न

Next Post

आदिवासी कुटुंबे खावटी अनुदान योजनेपासून वंचित राहणार?

Next Post

आदिवासी कुटुंबे खावटी अनुदान योजनेपासून वंचित राहणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group