जळगाव – धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचालित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय वाणिज्य विभाग आणि कॉम्पुटर फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने १२ रोजी “बँकिंग सिस्टिम अवेअरनेस ” या विषयावर ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास स्पीकर म्हणून एच डी एफ सी बँकेचे असिस्टंट मॅनेजर श्री. मयुर चौधरी हे लाभले होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी बँकेची व्याख्या सांगून सुरवात केली. बँकेचे किती प्रकार असतात ,बँकेत कोणकोणत्या प्रकारची कामे चालतात याबद्दलचा आढावा त्यांनी वर्तवला .त्यानंतर त्यांनी बँक अकाउंट्स विषयी माहिती दिली व कोणकोणते अकाउंट असतात त्याबद्दल सांगितले. तसेच त्यांनी transactions चे वेगवेगळे प्रकार जसे कि, आर टी जी एस , एन ई एफ टी ,आय एम पी एस , यु पी आय याबद्दल सांगितले.
तसेच बँके मधील वेगवेगळ्या योजनांबद्दल माहिती दिली. एवढेच नव्हे तर त्यांनी विद्यार्थ्यांना बँके मधील करीयर opportunity कशी असते ते पण सांगितले. सदर कार्यक्रमास 79 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ आर बी वाघुळदे , वाणिज्य विभाग प्रमुख प्रा . तृप्ती काळे, यांची उपस्थिती होती . तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. करिष्मा काळे यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशश्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.