मेष : अचानक धनलाभाची शक्यता आहे. आज आपणशुभसमारंभात सहभागी व्हाल. ज्या बातमीची अगदी अतुरतेने वाट पाहात होतात ती समजल्यामुळे आपल्या उत्साहाला उधाण येईल.
वृषभ : मामेबहणीच्या विवाहा संदर्भातील शुभघटना कानी येईल. आपल्यालावैवाहिक सुखाच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे. महत्वाचे निर्णय शांत विचारपूर्वक घरातील मोठ्या व्यक्तिच्या सल्याने घेणे आवश्यक आहे. मन सैरभैर होईल.
मिथुन : महत्वाचे निर्णय घेताना योग्य व्यक्तिचा सल्ला घ्या. नवीन व्यावसायिक करार घडतील. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल.
कर्क : आज आपण आर्थिक उलाढालीकरण्याचे शक्यतो टाळावे. महत्त्वाची आर्थिक कामे शक्यतो आजच करुन घ्यावीत. मन आनंदी, उत्साही राहील.
सिंह : कुटुंबावर आज आपल्या मतांचा प्रभाव पडेल. आपल्या वक्तृत्त्वावर सभोवतालच्या व्यक्ती हुरळून जातील. आपले ध्येय साध्य करता येईल.
कन्या : कामानिमित्त दूरचे प्रवास करावे लागतील. अपेक्षित गाठीभेटीतून आपली कामे यशस्वीरीत्या पार पडतील. नव्या उमेदीने कामाचा ध्यास घ्याल. कामानिमित्त परदेश प्रवास घडून येतील.
तूळ : अनेक जबाबदारीची कामे स्विकारावीलागतील. व्यवसाय वाढीसाठी मोठय़ा प्रमाणात आपल्याला गुंतवणूक करावी लागेल. नवी दिशा सापडेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रसिद्धी लाभेल.
वृश्चिक : शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीकारक घटना घडतील.विज्ञानशाखेतील व्यक्तिंना त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल पुरस्कार जाहीर होतील. जून्या मिळालेल्या ऑर्डर्समध्ये वाढ झाल्यामुळे कामाचा विस्तार होईल. आपल्या इच्छा आकांक्षांची पूर्तता होईल.
धनू : आज आपले मानसिक स्वास्थ चांगले राहिल. मातुल घराण्याकडूनवारसा हक्काने आर्थिक प्राप्ती होण्याचा योग आहे. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. व्यावसायिक प्रदर्शनातून फायदा होईल. नशिबाची साथ लाभेल.
मकर : मेजवानीचे बेत ठरतील. आपण पूर्वी केलेल्या कामाचे संबंधात आपले कौतुक होईल. जाणीवपूर्वक आपल्या विचारात बदल करण्याचा प्रयत्न करावा. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा.
कुंभ : व्यावसायिक क्षेत्रात काम करणार्यांना आज अनेक सुवर्णसंधी चालून येतील. आपण घेतलेले महत्वाच्या निर्णयांची आज अंमलबजावणी केली जाईल. भागीदाराचे सहाकार्य चांगले राहील. आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल.
मीन : आजचा दिवस आपल्यासाठ भाग्यकारकघटनांची पर्वणीच आणणार आहे. संतसज्जनांचा आपल्याला आज सहवास लाभेल. महत्वाचे निर्णय घेताना त्यातील तज्ञ व्यक्तिंचे मार्गदर्शन घ्यावे. कामानिमित्त प्रवास घडून येतील.