मुंबई : भारताचा धडाकेबाज खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याचा मराठीमध्ये बोलतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. मुंबईमध्ये आल्यावर आपण मराठीमध्येच बोलणार असल्याचं हार्दिक या व्हिडिओमध्ये म्हणत आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ टाकला आहे. युएईमध्ये झालेल्या आयपीएलवेळचा हा व्हिडिओ आहे. कसं काय हार्दिक भाऊ? असा प्रश्न मुंबईने हा व्हिडिओ शेयर करताना विचारलं आहे. हार्दिक पांड्यानेही या व्हिडिओवर एक नंबर, अशी कमेंट केली आहे.
कसं काय, Hardik भाऊ? ????#OneFamily #MumbaiIndians @hardikpandya7 pic.twitter.com/uml9qvLFaS
— Mumbai Indians (@mipaltan) December 11, 2020
काय म्हणताय, सगळं बरं आहे ना? आमची मुंबई.सगळं ठीक आहे. इकडे गरमी प्रचंड आहे. मी मराठी शिकत आहे. मुंबईमध्ये आल्यानंतरही मराठीमध्ये बोलणार आहे. मी मराठी बोलायला शिकत आहे आणि मला मराठी कळंत. इकडेच माझा सराव सुरू आहे,’ असं हार्दिक या व्हिडिओमध्ये म्हणाला आहे. सूर्यकुमार यादव याच्याकडून हार्दिक मराठीचे धडे घेत आहे.