पाचोरा प्रतिनिधी । शहरातील रुस्तम लतीफ तडवी (वय-४१) हा इसम गेल्या २५ ऑगस्टपासून हरवल्याची तक्रार त्यांची पत्नी शबाना तडवी यांनी पिंपळगाव (हरे.) पोलीस स्टेशनला केली आहे. याप्रकरणी तपास लागलेला नसल्यामुळे पत्नीने घातपात झाल्याची शंका व्यक्त केली आहे.
गेल्या २५ ऑगस्ट पासून माझे पती रुस्तम लतीफ तडवी ते बेपत्ता असून अद्यापपर्यंत घरी आलेले नाही. अशी तक्रार पिंपळगाव (हरे.) पोलीस स्टेशनला केली आहे. तसेच माझ्या पतीचा फोनही लागत नसल्याने त्यांच्या घातपाताची शंकाही शबाना तडवी यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची चौकशी पिंपळगाव हरे. पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक निता कायटे तसेच त्यांचे सहकारी करत आहे.