जळगाव – भारत विकास परिषद आयोजित ऑनलाईन एकल गीत स्पर्धेत येथील गोदावरी सीबीएसईच्या रंजना कदमबांडे अंजली धुमाळ यांनी प्रथम पारितोषीक मिळवत यश प्राप्त केले आहे.
६ वी ते ८ वी प्रथम गट, ९ वी ते १२ वी व्दीतीय गट, तर पुढील खुला गट अशा तिन गटात संपन्न झालेल्या या स्पर्धेत त्यांनी खुल्या गटात सहभाग नोंदवला होता. विभागीय स्तरावर जळगाव जिल्हयात प्रथम फेरी संपन्न झाली यातही त्यांनी प्रथम पारितोषीक मिळवत प्रांतीय फेरीत प्रवेश मिळवला होता. यानंतर प्रांतीय फेरीतही त्यांनी प्रथम पारितोषीक मिळवत यश प्राप्त केले.
जवळपास ५०० च्या वर स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला होता. ऑनलाईन पध्दतीने भारत विकास परिषदेने या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यांच्या यशाबददल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून जल्लोष व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या यशाबददल गोदावरी फॉउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, शाळेच्या प्रिन्सीपल निलीमा चौधरी यांनी कौतुक करत अभिनंदन केले आहे.