जळगांव – भारत सरकार नेहरू युवा केंद्र,जळगांव व संलग्न संस्था मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन यांचा तर्फे खेळाडूना क्रिडा साहित्य वाटप करण्यात आले.
क्रीडा पटूंनी विविध खेळात प्राविण्य मिळवून नावलौकिक करावे असे मनोगत मौलना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना काढले.
पोलीस कवायत मैदान या ठिकाणी नियमित हॉलीबॉल व फुटबॉल या खेळाची नियमित सराव करणाऱ्या पोलीस बॉईज संघाच्या खेळाडूंना मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन तर्फे हॉलीबॉल, नेट, फुटबॉल साहित्य संस्था अध्यक्ष फिरोज शेख यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी पोलीस बॉईज असोसिएशनचे कुणाल मोरे, रफिक तडवी, आसिफ काझी, नितीन पाटील, चेतन निंबोळकर,पवन तडवी,शेखर तडवी,
नेहरू युवा केंद्र, जळगांव समनव्यक नरेन्द्र डागर व अजिंक्य गवडी यांचे मार्गदर्शन लाभले.