Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

देशात आज डॉक्टरांचा संप, जाणून घ्या काय-काय राहील बंद

by Divya Jalgaon Team
December 11, 2020
in राष्ट्रीय
0
देशात आज डॉक्टरांचा संप, जाणून घ्या काय-काय राहील बंद

नवी दिल्ली : इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने आज म्हणजे 11 डिसेंबर 2020 ला देशभरात डॉक्टरांच्या संपाची घोषणा केली आहे. आयएमएने आयुर्वेदच्या पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टरांना सर्जरीची मंजूरी देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात संपाची घोषणा केली आहे. देशव्यापी संपाच्या दरम्यान सर्व अनावश्यक आणि विना कोविड सेवा बंद राहतील. मात्र, आयसीयू आणि सीसीयू सारख्या इमर्जन्सी सेवा जारी राहतील. मात्र, अगोदर ठरलेली ऑपरेशन्स होणार नाहीत. आयएमएने संकेत दिला आहे की, येत्या आठवड्यात आंदोलन आणखी तीव्र होऊ शकते.

देशात आज डॉक्टरांचा संप, जाणून घ्या काय-काय राहील बंद

प्रायव्हेट हॉस्पीटलमध्ये बंद राहतील ओपीडी

आयएमएच्या संपाच्या दरम्यान खासगी हॉस्पीटलमधील ओपीडी बंद राहतील, परंतु सरकारी हॉस्पीटल सुरू राहतील. खासगी हॉस्पीटलमध्ये केवळ इमर्जन्सी आरोग्य सेवा जारी राहतील. देशभरातील खासगी हॉस्पीटल्सने संपावर चिंता व्यक्त केली आहे. सोबतच आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्यासाठी पावले उचलली जात आहेत. आयएमएने म्हटले की, 11 डिसेंबरला सर्व डॉक्टर सकाळी 6 वाजल्यापासून सायंकाळी वाजेपर्यंत संपावर राहतील. काही दिवसांपूर्वी सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन (सीसीआयएम) कडून जारी अधिसूचनेत म्हटले होते की, आयुर्वेदचे डॉक्टरसुद्धा आता जनरल आणि ऑर्थोपेडिक सर्जरीसह डोळे, कान, घशाची सर्जरी करू शकतील.

देशात आज डॉक्टरांचा संप, जाणून घ्या काय-काय राहील बंद

केंद्र सरकारने 39 सामान्य सर्जरीची दिली आहे मंजूरी

आयएमएने म्हटले आहे की, सीसीआयएमची अधिसूचना आणि नीती आयोगाकडून चार समितीच्या गठनमुळे केवळ मिक्सोपॅथीला प्रोत्साहन मिळेल. असोसिएशनने अधिसूचना मागे घेणे आणि निती आयोगाकडून गठित समिती रद्द करण्याची मागणी केली आहे. सीसीआयएमने आयुर्वेदातील काही खास क्षेत्रात पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टरांना सर्जरी करण्याचा अधिकार दिला आहे. केंद्र सरकारने नुकताच एक अध्यादेश जारी करून आयुर्वेदात पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टरांना 58 प्रकारच्या सर्जरी शिकणे आणि प्रॅक्टिस करण्याची परवानगी दिली आहे. सीसीआयएमने 20 नोव्हेंबर 2020 ला जारी अधिसूचनेत 39 सामान्य सर्जरी प्रक्रियांना सूचीबद्ध केले होते, ज्यांच्यामध्ये 19 प्रक्रिया डोळे, नाक, कान आणि घशाशी संबंधीत आहेत.

अजून वाचा 

1 जानेवारीपासून चेक पेमेंटची पद्धत बदलणार, लागू होणार नवा नियम

Share post
Tags: #Indian Medical AssociationDivya JalgaonDoctorNew Delhiजाणून घ्या काय-काय राहील बंददेशात आज डॉक्टरांचा संप
Previous Post

नवीन फिनिशरच्या शोधात टीम इंडिया, ‘हे’ तीन खेळाडू शर्यतीत

Next Post

1 जानेवारीपासून चेक पेमेंटची पद्धत बदलणार, जाणून घ्या नियम

Next Post
1 जानेवारीपासून चेक पेमेंटची पद्धत बदलणार, लागू होणार नवा नियम

1 जानेवारीपासून चेक पेमेंटची पद्धत बदलणार, जाणून घ्या नियम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group