क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ बनण्यासाठी फलंदाजीत उत्कृष्ट सुरुवातीसोबतच शेवटही उत्तम होणे गरजेचे असते. इतिहासात डोकावून बघितले असता मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम संघांकडे उत्कृष्ट फिनिशर होते. २१ व्या शतकाच्या सुरुवातीला सर्वोत्तम असलेल्या ऑस्ट्रेलिया संघात ‘मायकल बेवनने’ फिनिशर म्हणून योग्यरीत्या भूमिका पार पाडली. भारतीय संघाकडून गेली अनेक वर्ष एमएस धोनीने फिनिशरची भूमिका पार पाडली होती. धोनीच्या निवृत्तीनंतर गेल्या वर्षांपासून भारतीय संघ फिनिशरच्या शोधात आहे. सध्या भारतीय संघ या तीन अष्टपैलू खेळाडूंमध्ये फिनिशर शोधत आहे.
हार्दिक पंड्या
हार्दिक पंड्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने मागील काही वर्षात सर्व क्रिकेट पंडितांची वाहवा मिळवली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात हार्दिकने फिनिशर म्हणून उत्तम भूमिका पार पाडली. सर्व भारतीय क्रिकेट रसिक धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पंड्याकडे बघत आहेत. पंड्याने नुकत्याच खेळलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील ३ सामन्यात १०५ च्या सरासरीने २१० धावा कुटल्या होत्या, तर गोलंदाजी करताना केवळ १ विकेट आपल्या खिशात घातली होती.
रवींद्र जडेजा
भारताचा अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाने मागील १८ महिन्यांत आपल्या आक्रमक फलंदाजीने क्रिकट पंडितांचे लक्ष आपल्याकडे वळवून घेतले आहे.ऑस्ट्रेलिया दौऱ्यात देखील जडेजाने काही उत्तम खेळ्या केल्या आहेत. गोलंदाजी सोबतच फिनिशर म्हणून देखील आगामी काळात जडेजाकडून चांगल्या कामगिरीची सर्वांना आशा आहे. पंड्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील ३ सामन्यात ५७.५० च्या सरासरीने ११५ धावा केल्या होत्या, तर गोलंदाजी करताना केवळ १ विकेट घेतली होती.
वॉशिंग्टन सुंदर
युवा वॉशिंग्टन सुंदरने आपल्या अचूक गोलंदाजीने भारतासाठी उत्तम कामगिरी केलेली आहे. पवार प्लेमध्ये फलंदाजांना बांधून ठेवण्याचे काम सुदंर करतो. तसेच अनेक वेळा त्याने शेवटच्या षटकांत उत्तम फलंदाजी देखील केलेली आहे. तामिळनाडूकडून खेळताना त्याने फलंदाजीत अनेक उत्कृष्ट खेळ्या केलेल्या आहेत. भारतीय संघ देखील भविष्यात सुंदरकडून फलंदाजीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा करेल. सुंदरकडे क्षमता असून तो त्या क्षमतेचा वापर महत्त्वाच्या सामन्यात कशा प्रकारे करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.