जळगाव – जळगावातील अमिता सतिष निकम या MED नांदेड स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठातुन ७७% मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत.
त्या किड्स गुरुकुल शाळेत शिक्षिका असून त्यांनी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत गरीब विद्यार्थांना मोफत शिक्षण क्लासेस त्या घेत आहे. तसेच त्या अँचिव्हर्स द एज्युकेशन हबच्या संचालिका असून संस्कृत भाषेत त्यांनी प्रभुत्व मिळवले आहेत.
त्या असित संस्कृत अकॅडमीच्या माध्यमातुन संस्कृत भाषेचा प्रसार प्रचार ही करत असतात. MED च्या अभ्यासक्रमासाठी नांदेडचे प्राचार्य डाँ. शेखर घुंगरवार, प्राचार्य डाँ. घुले, चाळीसगावचे प्रा. गौतम निकम यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या या यशाबद्दल सर्व शैक्षणिक क्षेत्रातुन अभिनंदन होत आहे.