Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन संस्थेकडून होणार नवउद्योजकांचे बळकटीकरण

by Divya Jalgaon Team
December 10, 2020
in जळगाव, प्रशासन
0

जळगाव : जागतिक बँक अर्थसहाय्यीत कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये 7 वर्षे कालावधीत अंमलबजावणीकरीता शासनाची मान्यता प्राप्त आहे. स्मार्ट प्रकल्पाचे उद्दिष्टये, राज्यातील अल्पभुधारक शेतकरी व कृषि नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवुन समावेश आणि स्पर्धात्मक शेतमाल मुल्यसाखळयांच्या विकासाला मदत करणे हे असून ते साध्य करण्यासाठी उत्पादक आणि उद्योजकांना नविन व संघटीत बाजारपेठेत प्रवेश मिळवुन देण्यासाठी  आवश्यक ते तांत्रिक सहाय्य, पायाभुत सुविधा आणि जोखिम  निवारण क्षमता विकसीत  करण्यासाठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत पारंपारीक कृषि व्यवस्थेचे बळकटीकरण करुन  ती अधिकाधिक बाजाराभिमुख बनवणे आणि मुल्यसाखळीतील  खाजगी क्षेत्राचा सहभाग अधिक व्यापक करणे यावर भर असणार आहे.

त्याअनुषंगाने स्मार्ट प्रकल्पांतर्गत समुदाय आधारीत संस्था आणि संस्थात्मक खरेदीदार यांचेकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज हे शेतमाल, शेळया आणि परसबागेतील कुक्कूटपालन यांच्या मुल्यसाखळी विकासाच्या उपप्रकल्पांसाठी आहेत. मुल्यसाखळी विकासाचे उत्पादक भागीदारी उपप्रकल्प ( productive partnerships pp) आणि बाजार संपर्क वाढ ( Market Access plan MAP) उपप्रकल्पासाठी सदर अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारित संस्थांमध्ये आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरशन्स, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियानांतर्गत स्थापिक प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाव्दारे स्थापित लोकसंचलित साधन केंद्र यांचा समावेश आहे. गट / शेतकरी उत्पादक कंपनी पात्रतेचे निकष पुर्ण करते किंवा नाही याचा फारसा विचार न करता भविष्यात पात्रतेचे निकष पुर्ण करण्याच्या अधिन राहुन अर्ज सादर करण्यात यावा.

अर्ज सादर करण्यासाठी पात्र खरेदीदारांमध्ये राज्यातील तसेच राज्याबाहेरील कॉर्पोरेट्रस/ पक्रियादार / लघु – मध्यम उद्योजक / स्टार्टअप्स/ कोणताही खरेदीदार इ. चा समावेश आहे.  त्यानुसार प्राप्त होणाऱ्या अर्जापैकी पात्र स्पर्धात्मक व उत्कृष्ठ अर्जाना प्रकल्पाचे 60% पर्यत अनुदान उपलब्ध होईल. अर्ज करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना इ. माहिती  http://www.smart-mh.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी अर्ज दि. 15 डिसेंबर, 2020 सायंकाळी  5.00 पर्यंत स्मार्टच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगाव यांचेमार्फत करण्यात येत आहे.

Share post
Tags: Collector OfficeJalgaonJalgaon Latest NewsMarathi Newsबाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन संस्थेकडून होणार नवउद्योजकांचे बळकटीकरण
Previous Post

जिल्ह्यात आज ४३ नवीन रुग्ण आढळले; ४९ कोरोनामुक्त

Next Post

अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यात 7 लाख 68 हजार रुपयांचा प्रतिबंधित पदार्थ्यांचा साठा जप्त

Next Post

अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यात 7 लाख 68 हजार रुपयांचा प्रतिबंधित पदार्थ्यांचा साठा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group