Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अटल भुजल योजनेत अमळनेर, पारोळा तालुक्यातील ६३ गावांचा समावेश

by Divya Jalgaon Team
December 10, 2020
in जळगाव, राजकीय
0
अटल भुजल योजनेत अमळनेर, पारोळा तालुक्यातील ६३ गावांचा समावेश

जळगाव-  सिंचन पातळीमध्ये वाढ व्हावी म्हणून केंद्र सरकारकडून राज्यात राष्ट्रीय भूजल व्यवस्थापन सुधार प्रकल्प राबविला जाणार आहे.

या प्रकल्पा अंतर्गत राज्यातील १३ जिल्ह्यातील १४४३ गावांची निवड करण्यात आली असून यात जळगाव लोकसभा मतदार संघातील अमळनेर, पारोळा या दोन तालुक्यांमधील ६३ गावांचा समावेश झाल्याने हा परिसर अधिक सुजलाम् सुफलाम् होईल अशी भावना खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने या प्रकल्पाची घोषणा २०१९ मध्ये केली होती. त्यावर अध्ययन करून ती आता अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांच्या काळामध्ये ही योजना राबविली जाणार असून यासाठी १२५ कोटी ७७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना राबवितांना अतीशोषीत, शोषित, अंशतः शोषित पाणलोट क्षेत्रांना प्राधान्य दिले जाईल दिले गेले आहे. यामध्ये जळगाव लोकसभा क्षेत्रातील ६३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. राज्याच्या २०१३ मधील भूजल अहवालानुसार ७४ शोषीत, ४ अंशतः शोषीत असलेली १११ पाणलोट क्षेत्रामध्ये ही योजना प्राधान्यक्रमाने राबवली जाणार आहे. या सर्व ठिकाणी आगामी पाच वर्षाच्या काळात ही योजना राबवण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे.

यात पारोळा तालुक्यातील  अंबा पिंपरी , बहादरपूर, भोलाणे, जामदे, बोदर्डे ,वंजारी खुर्द, हनुमंतखेडे , इंधवे वडगाव प्र, अमळनेर, जिराळी, जोगलखेडे, कामतवाडी, खोलसर, महलपुर, मेहू, हिवरखेडा, मोरफळ, पळासखेडे सिम, पिंपळकोठा, पुनगाव, शेवगे बुद्रुक, शिरसोदे, सुमठाणे,  टेहू, उंदनीखालसा, उदनी दिगर, उंदीरखेडा, वसंत नगर, विचखेडे,  वाघरे, वाघरी या गावांचा समावेश करण्यात आलेला आहे.

तसेच अमळनेर तालुक्यातील  अमोदे,अंतुर्ली, राजमाने,बोहरे, चौबारी ,धानोरे ,धार ,फाफोरे बुद्रुक ,गलवाडे बुद्रुक ,बोरगाव, हेडवे, हिंगणे बुद्रुक, हिंगणे खुर्द प्र.ज., इंद्रपिंपरी, जैतपीर, करण खेडे, काव पिंप्री, अंबारे,खापरखेडा प्र डांगरी, लाडगाव, नांदगाव,मालपुर, मंगरूळ ,मारवाड, मुडी प्र अमळनेर, दरेगाव, प्रगणे डांगरी, सडावन खुर्द, शिरुड, टासखेडे,  वाघोदे ही अमळनेर तालुक्यांतील गावे या महत्वाकांक्षी योजनेत समावेश करण्यात आलेली आहे.

केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अटल भुजल योजनेत अमळनेर आणि पारोळा तालुक्यातील ६३ गावांचा समावेश झाल्याने या गावांची सिंचन पातळी वाढणार असून हा परिसर अधिक सुजलाम सुफलाम होईल अशी भावना खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केली.

Share post
Tags: 63 VillageChalisgaonJalgaonMarathi NewsPoliticalUnmesh Patilअटल भुजल योजनेत अमळनेरपारोळा तालुक्यातील ६३ गावांचा समावेश
Previous Post

महामार्गाला लागून असलेला मेहरूणला जाण्याचा रस्ता बंद होणार नाही

Next Post

श्रद्धा कॉलनीत विद्यार्थीनीसह पालकाची १५ हजारात फसवूणक

Next Post
जळगावात पिझ्झ्याबाबत चुकीच्या क्रमांकावर ऑनलाईन तक्रार केल्याची फसवणूक

श्रद्धा कॉलनीत विद्यार्थीनीसह पालकाची १५ हजारात फसवूणक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group