जळगाव – आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील दुरदर्शन टॉवर जवळ आयशर आणि गॅस कंन्टेनरची समोरासमोर जोरदार धडक दिल्याची घटना घडली.
यात आयशर चालक जखमी झाला असून गॅस कंटेनरचा चुराडा झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
यमूना ईश्वर माळी (रा. धुळे) यांच्या मालकीचा ट्रक (क्रमांक एमएच १८ बीएच ५३५५) नागपूर हुन मालेगावकडे कापडाचे सुत घेवून निघाला होता. आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास शहराजवळील दुरदर्शन टॉवरजवळ जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या गॅस कंन्टेनरने आयशरला जोरदार धडक दिली. यात गँस कंन्टेनरच्या पुढचा भागाचा पुर्णपणे चुराडा होवून गॅसने भरलेले कंटेनर रोडाच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडला.
गँस कंटेनरचा चालक हा फरार झाला आहे. तर आयशर वरील चालक गोरख गोविंदा पाटील (वय-२५ रा. रतनपूरा बोरकून ता.जि.धुळे) हा किरकोळ जखमी झाला असून आयशर गाडीच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळता एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी गणेश शिरसाळे आणि चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी जावून अपघाताचा पंचनामा केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्याचे काम सुरू होते.