Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे 47 व्या वर्षी निधन

देऊळ बंद, पाऊलवाट अशा अनेक मराठी चित्रपटातील गाण्यांचे संगीतकार नरेंद्र भिडे यांचे हार्ट अटॅकने निधन

by Divya Jalgaon Team
December 10, 2020
in मनोरंजन, राज्य
0
प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे 47 व्या वर्षी निधन

पुणे : भावपूर्ण गाण्यांपासून ठेका धरायला लावणाऱ्या गाण्यांना संगीताचा साज चढवणारे प्रख्यात संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे (10 डिसेंबर) त्यांचे निधन झाले. देऊळ बंद, पाऊलवाट अशा अनेक मराठी चित्रपटातील त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी गाजली आहेत.

प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे 47 व्या वर्षी निधन

नरेंद्र भिडे यांचे गुरुवारी (10 डिसेंबर) पहाटेच्या सुमारास हार्ट अटॅकने निधन झाले. वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सकाळी 9.30 वाजता पुण्यातील डॉन स्टुडिओमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर सकाळी अकरा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

भावपूर्ण संगीत देणारा अवलिया

पेईंग घोस्ट, देऊळ बंद, बायोस्कोप, रानभूल यासारख्या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन नरेंद्र भिडे यांनी केले होते. चि व चि सौ का या रोमँटिक कॉमेडी पठडीतील चित्रपटात त्यांनी दिलेली सुमधुर गाणी प्रेक्षकांच्या ओठी रुजली आहेत. याशिवाय हम्पी, उबंटू, लाठे जोशी, पुष्पक विमान, 66 सदाशिव यासारख्या सिनेमांतील गाण्यांनाही त्यांनी संगीत दिले.

लव्हबर्डस् या थ्रिलर मराठी नाटकाचे पार्श्वसंगीतही नरेंद्र भिडे यांनी दिले होते. मुळशी पॅटर्न या चित्रपटात त्यांनी भूमिकाही केली होती. तर आगामी सरसेनापती हंबीरराव या सिनेमातही ते काम करत होते.

सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतरही नरेंद्र भिडे यांच्यातील संगीतकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. मनोरंजन विश्वात पाऊल ठेवत त्यांनी अनेक चित्रपट गीतांना स्वरसाज चढवला. पुण्यातील डॉन स्टुडिओचे संगीत संयोजक आणि संचालक म्हणून ते कार्यरत होते.

अजून वाचा 

Breaking : प्रसिद्ध अभिनेत्री वीजे चित्रा यांची आत्महत्या

Share post
Tags: (Music Director Narendra Bhide passed away#Narendra BhideDeathDivya JalgaonMarathi NewsPuneSingerTodayनरेंद्र भिडे यांचे 47 व्या वर्षी निधनप्रसिद्ध संगीतकारप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे 47 व्या वर्षी निधन
Previous Post

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार नव्या संसदेचे भूमिपूजन

Next Post

पतीला बांधून ठेऊन जत्रेतून परतणाऱ्या महिलेवर 17 जणांचा बलात्कार

Next Post

पतीला बांधून ठेऊन जत्रेतून परतणाऱ्या महिलेवर 17 जणांचा बलात्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group