Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार नव्या संसदेचे भूमिपूजन

by Divya Jalgaon Team
December 10, 2020
in राष्ट्रीय
0
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार नव्या संसदेचे भूमिपूजन

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नव्या संसदेच्या इमारतीचं भूमीपूजन करणार आहेत. जवळपास 80 वर्षांनी देशात नवं संसद भवन निर्माण करण्यात येणार आहे. नवे संसदभवन गोल नव्हे त्रिकोणी आकाराचे असेल तसेच नवीन संसद भवनात लोकसभेचा आकार आता असलेल्या सभागृहाच्या तुलनेने तीन पटीने जास्त आहे. इतकंच नाही तर राज्यसभेचा आकारही मोठा असल्याचं सांगण्यात येत आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार नव्या संसदेचे भूमिपूजन 

टाटा प्रोजेक्ट्स लि. करणार बांधकाम इमारतीचं बांधकाम

टाटा प्रोजेक्ट लिमिटेडकडून एकूण 64,500 चौरस मीटर क्षेत्रामध्ये नवीन संसदेची इमारत बांधली जाणार आहे. नवीन संसद भवनाची रचना एचसीपी डिझाईन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने तयार केली आहे. नागरी व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन संसदेची इमारत ही नव्या भारताच्या गरजा आणि आकांक्षानुसार असणार आहे. पुढील 100 वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन ही इमारत तयार केली जाणार आहे. जेणेकरुन भविष्यात खासदारांची संख्या वाढली तरी कोणतीही अडचण उद्भवणार नाही.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार नव्या संसदेचे भूमिपूजन 

संसदेच्या या नव्या इमारतीला 4 मजले, 6 प्रवेशद्वार असतील. लोकसभेचे 1 हजार, तर राज्यसभेचे साधारण 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था असणार आहे. सध्या खासदारांना प्रत्येकाच्या आसनासमोर टेबल नाहीत. नव्या संसदेत प्रत्येकासमोर छोटे बाक असणार आहे. या बाकांमध्ये हजेरी नोंदवण्यासाठी, मतदान करण्यासाठी, भाषातंर ऐकण्यासाठी अत्याधुनिक व्यवस्था असेल. याशिवाय 120 कार्यालये, म्युझियम, गॅलरीही या इमारतीत असणार आहे.

नव्या संसदभवनाची वैशिष्ट्ये

संसदभवन स्वातंत्र्यांच्या 75 व्या वर्षी अर्थात ऑगस्ट 2022 पर्यंत बांधकाम पूर्ण

संसद भवनाला 861.90 कोटी रुपयांचा खर्च

केंद्रीय सचिवालय 2024 पर्यंत तयार होणार

लोकसभा-राज्यसभेतील रचना महाराष्ट्र विधानसभेसारखी

64,500 स्क्वे.मी. अंतरावर असेल संसदभवन

बांधकामात 2 हजार प्रत्यक्ष, 9 हजार अप्रत्यक्ष कारागिर

एकूण 1,272 खासदार एकाच वेळी बसण्याची क्षमता

अजून वाचा 

थायरॉईडसह, वजनसुद्धा नियंत्रणात ठेवतो अळशीचा काढा, जाणून घ्या कृती आणि फायदे

Share post
Tags: #New ParlimentBhumipujanDivya JalgaonMarathi NewsNew DelhiPM Narendra Modiआज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला भेट देणारनवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदीभूमिपूजन
Previous Post

जलसंधारण अधिकारी यांच्याकडील अधिकारीपदाची सूत्रे काढा- पल्लवी सावकारे

Next Post

प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे 47 व्या वर्षी निधन

Next Post
प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे 47 व्या वर्षी निधन

प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे 47 व्या वर्षी निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group