नवी दिल्ली : अळशीची बियांमध्ये आरोग्याची अनेक गुपिते दडलेली आहे. यातील व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर, ओमेगा 3 फॅटी अॅसिड इत्यादी सारखी पोषकतत्व विविध आजारांपासून आपल्याला दूर ठेवतात. आळशीचा काढा अनेक रोगांवर रामबाण उपाय आहे. इतकेच नव्हे, हा काढा घेतल्याने थायरॉईडसह वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. हा काढा बनवण्याची कृती आणि त्याचे फायदे जाणून घेवूयात.
असा तयार करा अळशीचा काढा –
दोन चमचे अळशीच्या बिया दोन कप पाण्यात मिसळून ते अर्धे होईपर्यंत उकळवा. आता तुमचा अळशीचा काढा तयार झाला आहे. काढा गाळून कोमट झाल्यानंतर प्या.
अळशीचा काढा पिण्याचे फायदे
1 वजन कमी होते
शरीरात जमा अतिरिक्त चरबी विरघळण्यास मदत होते. वजन कमी होते. उर्जा मिळते.
2 ब्लड शुगर नियंत्रणात राहते
डायबिटीजच्या रूग्णांसाठी हा काढा वरदान आहे. नियमित घेतल्यास डायबिटीज नियंत्रणात राहतो.
3 थायरॉईडमध्ये परिणामकारक
सकाळी रिकाम्यापोटी हा काढा धेतल्यास हायपोथायरॉईड आणि हाइपरथायरॉईड दोन्ही स्थितीत लाभ होतो.
4 सांधेदुखीत आराम
सायटिका, नस दबणे, गुडघ्यांमध्ये वेदना यावर हा काढा लाभदायक आहे.
5 हार्ट ब्लॉकेजला दूर ठेवतो
नियमित 3 महिन्यापर्यंत अळशीचा काढा प्यायल्याने आर्टरी ब्लॉकेजची समस्या सुद्धा दूर होते. खराब कोलेस्ट्रॉल एलडीएलचा स्तर कमी होतो.
6 पोटाची समस्या
नियमित हा काढा घेतल्यास बद्धकोष्ठता, पोटदुखी, पोट फुगणे इत्यादी समस्या दूर होतात.
7 केस आणि त्वचा
केस गळतीची समस्या दूर होते. तीन-चार महिने सतत काढा घेतल्यास केस पांढरे होण्याची प्रक्रिया थांबते.
अजून वाचा
शिक्षकांसाठी खुशखबर : राज्यातील शिक्षक भरती पुन्हा सुरू होणार!