जळगाव : तालुक्यातील एरंडोल येथे एक धक्कादायक घटना आज सकाळच्या सुमारास घडली. आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह पळासदळ शिवारात आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
एरंडोल तालुक्यातील आदर्श शिक्षक किशोर पाटील हे गालापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. काल सोमवारी ते गालापूर येथील शाळेत गेले. मात्र ते घरी परत आले नाही. रात्री त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. कुंझरकर यांच्या अंगातील बनियानचा फाटलेला आहे. व त्यांच्या डोक्याला देखील मार लागलेला आहे. घटनास्थळी त्यांची मोटारसायकल देखील नाही होती. किशोर पाटील व त्यांची पत्नी हे दोघे शिक्षक आहे. तसेच किशोर पाटील हे संघटनेशी निगडीत होते.
कोरोना काळात आदिवासी वस्तीवर ऑनलाईन शिक्षणात अनेक अडथळे येत असताना त्या अडचणींचे रडगऱ्हाणे न गाता प्रयोगशील प्रभारी मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर व त्यांच्या अर्धांगिनी शिक्षिका जयश्री पुरुषोत्तम पाटील यांनी घर…घर..शाळा – शिक्षण आपल्या दारी हा उपक्रम राबवून आदिवासी वस्ती पर्यंत शिक्षण पोहचविले आहे.
मात्र आज सकाळी त्यांचा मृतदेह पलासदळ जवळ आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली आहे . किशोर पाटील यांच्या अंगावरील फाटलेले आढळून आले आहेत त्यामुळे त्यांच्याशी कुणी हातापायी केली आहे का ? नेमके या ठिकाणी पाटील हे का आले होते ? याबद्दल पोलीस प्रशासन तपास करीत आहे.


